🚩 कुंभमेळा बातम्या | 🚦Traffic Updates

नाशिक: म्हसरूळला महिलेच्या गळ्यातील ९० हजारांचे मंगळसूत्र खेचले

नाशिक। दि. ९ जून २०२५: भाजीपाला घेऊन पायी जाणाऱ्या महिलेच्या समोरुन आलेल्या दुचाकी चालकाने गळ्यातील ९० हजारांचे मंगळसूत्र खेचून नेले. पुष्पकनगर, प्रभात नगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर म्हसरूळ येथे हा प्रकार घडला. म्हसरूळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: मुलगी झाल्याच्या कारणावरून विवाहितेचा छळ; सासरच्या सहा जणांविरोधात गुन्हा

पोलिसांनी दिलेली माहिती आणि प्रभावती घडवजे (रा. प्रभातनगर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, सायंकाळी ६.३० वाजता घरातून कणसरा माता चौक येथून भाजीपाला खरेदी करुन पायी घराकडे येत असतांना पुष्पकनगर-प्रभातनगरकडे जाणाऱ्या रोडवर विष्णूप्रित बंगल्यासमोर दुचाकीवरील व्यक्तीने समोरुन येत गळ्यातील मंगळसूत्र खेचून नेले. याबाबत घडावजे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (गुन्हा रजिस्टर क्रमांक: १५२/२०२५)

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790