🚩 कुंभमेळा बातम्या | 🚦Traffic Updates

नाशिक: ६ गोवंशांची सुटका, दोन जण ताब्यात, गुंडाविरोधी पथकाने केली कारवाई

नाशिक (प्रतिनिधी): कत्तलासाठी वाहतूक करत असणाऱ्या दोघांकडून ६ गोवंशांची सुटका करण्यात आली. गुंडाविरोधी पथकाने गंगापूर रोडवर ही कारवाई केली.

संशयित पिकअप चालक नामदेव पावडे (रा. पिंपळद), अरकान उर्फ अप्पू अजीज कुरेशी (रा. मदीनानगर, वडाळा) अशी या संशयितांची नावे आहेत. गिरणारे गाव येथून गंगापूर मार्गे गोवंशाची कत्तलीसाठी वाहतूक केली जात आहे, अशी माहिती पथकाला माहिती मिळाली. पथकाने सापळा रचून पिकअप (एमएच १५ एफ.व्ही. ९७२४) थांबवली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: मुलगी झाल्याच्या कारणावरून विवाहितेचा छळ; सासरच्या सहा जणांविरोधात गुन्हा

पिकअपमध्ये ६ गोवंश कोंबून भरलेले दिसून आले. कुरेशी याच्या सांगण्यावरून वडाळागाव येथे निसार कुरेशी याच्या गोदामात ही जनावरे कत्तलीसाठी घेऊन जात असल्याची माहिती चालकाने दिली.

सदरची कामगिरी गुंडा विरोधी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, मलंग गुंजाळ, विजय सुर्यवंशी, प्रदिप ठाकरे, भुषण सोनवणे, अक्षय गांगुर्डे, राजेश राठोड, कल्पेश जाधव, प्रविण चव्हाण, अशोक आघाव यांनी संयुक्तरित्या कामगिरी पार पाडली आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790