नाशिक: लिफ्ट घेण्याच्या बहाण्याने लूटमार करणारे गजाआड; मौजमजेसाठी लूटमार

नाशिक (प्रतिनिधी): लिफ्ट घेण्याच्या बहाण्याने वृद्धास निर्जनस्थळी नेत मारहाण करीत लूटमार करणाऱ्या दोघा संशयितांना गुंडाविरोधी पथकाने नाशिक रोड रेल्वेस्थानक परिसरातून पकडले आहे. दोघेही पंचवटीतील भाजीपाला मार्केट यार्ड येथे हमाली काम करत असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे.

अनिल गौतम इंगळे (२२) व अभिषेक सुनील चौघुले (२४, दोघे रा. पंचवटी) अशी या संशयितांची नावे आहेत. शुक्रवारी (दि. १६) रात्री १०.३० वाजता ॲन्थोनी गॅब्रियल साळवे (६५, रा. जेलरोड) हे चर्चमधून घरी जात होते. त्यावेळी एका युवकाने त्यांच्याकडे लिफ्ट मागितली असता त्यांनी त्यास दुचाकीवर बसवले. दरम्यान, त्या युवकाने त्याच्या जोडीदारास बोलावून घेत बोधलेनगर सिग्नल परिसरात साळवे यांना दुचाकी थांबवण्यास सांगितले.

👉 हे ही वाचा:  नाशिकमध्ये दोन टोळ्यांतील चकमक प्रकरणी ६ आरोपी पकडले; २ गावठी कट्टे, स्विफ्ट कार जप्त

तेथे साळवे यांना दगडाने मारहाण करीत त्यांच्याकडून सोन्या-चांदीचे दागिने, मोबाइल, एटीएम कार्ड व दुचाकी (एमएच १५, ईएम ६३३१) असा ५३ हजारांचा ऐवज हिसकावून नेला. या प्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. गुंडाविरोधी पथकाने या घटनेचा समांतर तपास केला. अंमलदार राजेश राठोड यांना भाजीपाला मार्केट यार्डमधील दोघे हमाल दुचाकीवर छत्रपती संभाजीनगर येथे गेल्याचे समजले.

👉 हे ही वाचा:  नाशिक: रिक्षाचालकाचा 3 प्रवाशांवर प्राणघातक हल्ला; गुन्हा दाखल

तसेच ते मंगळवारी (दि. २०) रात्री रेल्वेने नाशिकला येणार असल्याची खबर मिळाली. त्यानुसार सहायक निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली दोन पथक तयार करण्यात आले. एका पथकाने मार्केट यार्ड येथे चौकशी केली, तर दुसरे पथक रेल्वेस्थानकात गेले. या पथकाने दोघा संशयितांना ताब्यात घेतले. दोघांचाही ताबा उपनगर पोलिसांकडे सोपवण्यात आला आहे.

👉 हे ही वाचा:  नाशिकच्या साल्हेरसह १२ किल्ले 'युनेस्को'च्या जागतिक वारसा स्थळ यादीत !

मौजमजेसाठी लूटमार:
दोघांनी चौकशीत मौजमजा करण्यासाठी लूटमार केल्याची कबुली दिली. गुन्हा केल्यानंतर ते साळवे यांच्या दुचाकीवरून छत्रपती संभाजीनगरला पळून गेले. तेथेच त्यांनी दुचाकी व इतर मुद्देमाल लपवल्याचे सांगितले

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790