नाशिक। दि. १५ जून २०२५: खुनाच्या गुन्ह्यातील फरार संशयिताला अटक करण्यात आले. गुन्हे शाखा युनिट २ च्या पथकाने पाथर्डी फाटा येथे ही कारवाई केली. नौशाद अजिज सैय्यद मुलानी असे या संशयिताचे नाव आहे. दि. १३ एप्रिल रोजी रामा बोराडे या युवकाच्या खुनाच्या गुन्ह्यात संशयित तीन महिन्यांपासून फरार होता.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पाथर्डी फाटा येथे पथक गस्त करत असताना इंदिरानगर पोलिस ठाण्यात दाखल खुनाच्या गुन्ह्यातील संशयित पाथर्डी फाटा येथे आल्याचे समजले. पथकाने परिसरात सापळा रचला. तेव्हा उड्डाणपुलाखाली तो उभा असल्याचे दिसून आले. पथकाने त्याला ताब्यात घेत चौकशी केली असता दि. १३ एप्रिल रोजी रात्री पांडवलेणी येथे राम बोराडे याचा तलवारीने वार करत खून केल्याची आणि परिसरातील वाहनांची कोयता, तलवारीने तोडफोड केल्याची कबुली त्याने दिली.
![]()

