नाशिक (प्रतिनिधी): भरधाव जाणाऱ्या ट्रकने पिकअपला मागून धडक दिल्याने पिकअप दुचाकीवर आदळून झालेल्या अपघातात दुचाकीचालक ठार झाला. पहाटे साडे चार वाजता एस.टी. डेपो वर्कशॉपसमोर, पेठरोड येथे हा अपघात घडला. याप्रकरणी म्हसरुळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती आणि रामदास काकड (रा. तवली फाटा) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, भाचा सिद्धेश कांगणे (२८, रा. दोनवाडे, हल्ली रा. मखमलाबाद) हा पहाटे साडे चार वाजता मखमलाबाद इरिगेशन कॉलनीकडून दुचाकीने (एमएच १५ एचझेड ५४७७) मखमलाबादकडून नाशिककडे जाताना एस.टी. वर्कशॉपसमोरील रोडवर पुढे जाणाऱ्या पिकअपने (एमएच ०५ इएल ७२३५) पाठीमागून येत असताना ट्रकने (टीएन ५२ एफ ७४४७) पिकअपला समोरून धडक दिल्याने पिकअपला जोरात लोटत नेत दुचाकीला पिकअपची धडक बसल्याने दुचाकीचालक खाली पडला.
त्याच्या डोक्यास गंभीर मार लागल्याने मृत्यू झाला. म्हसरुळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (गुन्हा रजिस्टर क्रमांक: १०४/२०२५)