HomeAd

नाशिक: भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीचालक ठार

नाशिक। दि. ०६ जून २०२५: भरधाव वेगात जाणाऱ्या कारने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीचालक ठार झाला. गुरुवारी (दि. ५) दुपारी २.३० वाजता दसक पुलावर नांदूरनाका येथे हा अपघात घडला. भाऊसाहेब कचरू सानप (४८, रा. गुळवंच, सिन्नर) असे मृत्यू झालेल्या चालकाचे नाव आहे. आडगाव पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

👉 हे ही वाचा:  नाशिक: 'समृद्धी'वरून एका दिवसात ३८ हजार वाहनांचा प्रवास

आडगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सानप हे दुचाकीने नांदूरनाक्याकडून जेलरोडकडे जात असताना दसक पुलाजवळ नांदूरनाका बाजुकडून येणाऱ्या अनोळखी वाहनाने धडक दिली. यात सानप गंभीर जखमी झाले. त्यांच्या पुतण्याने त्यांना सिव्हिलमध्ये दाखल केले. डॉक्टरांनी मृत घोषित केले. याप्रकरणी पोलिस पुढील तपास करत आहेत. (आडगाव पोलीस स्टेशन, अकस्मात मृत्यू रजिस्टर क्रमांक: ७६/२०२५)

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790