नाशिक (प्रतिनिधी): पेठ रोडवरील नाशिक महापालिकेच्या कमानी जवळ मिक्सर ट्रक आणि राज्य महामंडळाच्या लाल परी बसचा समोरासमोर धडक झाली.
अपघाताची माहिती तातडीने पोलिस आणि १०८ अॅम्ब्युलन्स यांना देण्यात आली. त्यानंतर तातडीने अॅम्ब्युलन्स मदतीला दाखल झाली. या अपघातात मिक्सर ट्रकचा चालक बाळू एकनाथ बेंडकुळे ( ६०, रा,आशेवडी, ता. दिंडोरी) ठार झाला असून बस चालक गंभीर जखमी झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पेठ बस आगारातील बस क्रमांक एम एच ४० वाय ५९७६ ही गुरुवार (ता.२२) रोजी पेठ हून नाशिक व्हाया पुण्याला चालली होती. साडे चार ते पाऊने पाच वाजेच्या दरम्यान पेठरोड हून मार्गक्रमण करीत असताना नाशिककडून आशेवाडी कडे जाणारा आरएमसी मिक्सर ट्रक यांचा समोरा समोर अपघात झाला.
या अपघातात आशेवाडी येथील साठ्ठ वर्षीय मिक्सर ट्रक चालक बाळू बेंडकुळे जागीच ठार झाले. तसेच या बस चालक गंभीर जखमी झाले आहेत. जवळपास आठ ते दहा प्रवाशी किरकोळ जखमी झाल्याचे समजते.
पेठ व जुना आडगाव नाका येथील १०७ चे ॲम्बुलन्स ने जखमींना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. तसेच बसमधील प्रवासी दुसऱ्या बसने नाशिककडे पोहोचले असून, काही जखमींना बसमधूनही शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून जखमींवर उपचार सुरू आहेत.
नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा...
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790