💥 BREAKING NEWS: नाशिक: आठ वर्षीय दिव्यांग बालकावर अनैसर्गिक अत्याचार करून खून

Breaking News: दक्षिण आफ्रिकेतून दोन जण नाशिकला परतले… जाणून घ्या सविस्तर…

Breaking News: दक्षिण आफ्रिकेतून दोन जण नाशिकला परतले… जाणून घ्या सविस्तर…

नाशिक (प्रतिनिधी): दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोनाच्या नवीन ओमिक्रॉन व्हेरियंटने सध्या जगभरात धास्तीचे वातावरण आहे.

दक्षिण आफ्रिकेतील आयर्नमॅन स्पर्धेत भाग घेऊन दोन खेळाडू नाशिकमध्ये चार दिवसांपूर्वी परतले असल्याची माहिती समोर येत आहे.

दरम्यान महापालिकेने या दोघांचे स्वॅब तपासणीसाठी घेतले होते आणि या दोन्ही खेळाडूंचे संस्थात्मक विलगीकरणक करण्यात आले होते.

हे ही वाचा:  नाशिक: शहरात २ फेब्रुवारीपर्यंत मनाई आदेश लागू

आता या दोघांचेही रिपोर्ट्स आले असून दोघांचेही रिपोर्ट्स निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे शासकीय यंत्रणेने सुटकेचा निश्वास सोडला आहे. असं असलं तरीही नाशिककरांनी आता अधिक काळजी घेणं गरजेचं आहे. दरम्यान देशात सध्या कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरियंटचा एकही रुग्ण नसल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.

हे ही वाचा:  नाशिक: आठ वर्षीय दिव्यांग बालकावर अनैसर्गिक अत्याचार करून खून

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलंय की, ओमिक्रॉन संदर्भात दोन मीटिंग झाल्या. एक टास्क फोर्ससोबत आणि संपूर्ण राज्यातील अधिकाऱ्यांसोबत एक बैठक झाली. या नव्या विषाणूला ‘व्हेरियंट ऑफ कन्सर्न’ म्हणून घोषित करण्यात आला आहे. साऊथ आफ्रिकेमध्ये संपूर्ण डेल्टा व्हेरियंटने बाधित रुग्णांना ओमिक्रॉनने ग्रासलेले आहे. या विषाणूची संसर्गजन्यता अधिक असल्याचं स्पष्ट आहे. त्याचं टेस्टींग आरटीपीसीआरने होऊ शकतं, हे स्पष्ट झालंय. जागतिक आरोग्य संघटना याबाबत अधिक माहिती देत आहे, त्यावर आम्ही लक्ष ठेवून आहोत, असं त्यांनी सांगितलय..!
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
Breaking: नाशिकमध्ये शाळा सुरू करण्याबाबत घेण्यात आला हा महत्वाचा निर्णय!
राज्य सरकारची नवीन नियमावली अराजकतेला आमंत्रण देणारी: ललित गांधी

11 Total Views , 1 Views Today

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790