नाशिक: घरफोडीचे सहा गुन्हे उघडकीस; अंबड एमआयडीसी पोलिसांची कारवाई !

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): सहा महिन्यांपासून विविध ठिकाणी घरफोडी करणाऱ्या दोन संशयितांना एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेत त्यांच्याकडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांचा साडेपाच लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश मिळवले आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंबड एमआयडीसी पोलिस चौकीच्या हद्दीतील अंबड औद्योगिक वसाहत, दत्तनगर आदी परिसरात घरफोडी व चोरीचे प्रकार वाढले होते. याबाबत घरफोडी करणाऱ्या चोरट्यांचा तपास सुरू असताना पोलिस शिपाई किरण सोनवणे यांना घरफोडी करणाऱ्या चोरट्यांची गोपनीय माहिती मिळाली होती.

⚡ हे ही वाचा:  त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात एईडी यंत्रणा कार्यान्वित

यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनोहर कारंडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संदीप पवार व यांच्या पथकाने पुणे मंचर येथे जाऊन घरफोडी करणारा संशयित भारत सखाराम खरात (वय ३२) यास ताब्यात घेतले. त्याला पोलिसांनी खाक्या दाखविताच त्याने एमआयडीसी पोलिस चौकीच्या हद्दीत सहा महिन्यांत साथीदारांसह सहा ते सात बंद घरे व कंपनीत बेकायदेशीर प्रवेश करून घरफोडी केल्याचे कबूल केले.

⚡ हे ही वाचा:  पोलिस रेझिंग डे निमित्त पोलिसांकडून तक्रारदारांना २.९९ कोटींचा मुद्देमाल परत

पोलिसांनी त्याच्याकडून घरफोडी करून चोरी केलेले सोन्या-चांदीचे दागिने, मंगळसूत्र असा एकूण पाच लाख २२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच या चोरट्यांचा नाशिक येथील साथीदार सोनू उर्फ (गणेश) दादाजी कांबळे (वय, २४ रा. घरकुल, अंबड) याला देखील पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्यावर घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे.

या चोरट्यांकडून अजूनही घरफोडीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात आली असून, त्यांच्या इतर साथीदारांचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. सदरची कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनोहर कारंडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संदीप पवार, नाईक समाधान चव्हाण, सुरेश जाधव, अर्जुन कांदळकर, दिनेश नेहे, अनिल कुराडे, जनार्दन ढाकणे, किरण सोनवणे, श्रीहरी बिराजदार यांच्या पथकाने केली.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790