नाशिक : बापरे, इतके लाख नागरिक धोकादायक स्थितीत; घेतलाच नाही दुसरा डोस
नाशिक (प्रतिनिधी): कोरोना तिसऱ्या लाटेचा सामना करण्याची प्रशासनाने तयारी केली असताना आता दक्षिण आफ्रिकेत ओमिक्रॉन हा सातपटीने आक्रमण करणारा विषाणू आढळल्यानंतर महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडून पहिला व दुसरा डोस घेतलेल्या नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले.
त्यात एक लाख २३ हजार नागरिक असे आहेत की त्यांना पहिला डोस घेतला, परंतु कोव्हॅक्सिन किंवा कोव्हीशिल्ड घेण्यासाठी अनुक्रमे तीस व ८४ दिवसांची मुदत उलटूनही दुसरा डोस घेतला नाही.
त्यामुळे पहिल्या डोसचा प्रभाव कमी होऊन कोरोनाच्या धोकादायक स्थितीत जाऊ नये म्हणून दुसरा डोस देण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
शहरात कोरोना पहिल्या लाटेने हैरान झालेल्या नाशिककरांना दुसऱ्या लाटेने पहिल्यापेक्षा मोठा तडाखा दिला. दुसऱ्या लाटेचा तडाखा इतका भयानक होता की, प्रत्येक नागरिक चिंताग्रस्त बनला. त्यामुळे महापालिका प्रशासनाने लसीकरणाचे उद्दिष्ट निश्चित केले. २६ जानेवारीपासून शहरात लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली. सर्वप्रथम कोरोनायोद्धे अर्थात कोरोना रुग्णांसाठी झटणाऱ्यांना डोस देण्यात आला.
त्यानंतर साठ वयोगटापुढील नागरीकांना लस देण्यात आली. त्यानंतर ४५ वर्षांपुढील नागरिकांना लस देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले. एक मेपासून अठरा वयोगटापुढील सर्वच नागरिकांना सरसकट डोस देण्याचे धोरण अवलंबिले. परंतु, डोसचा पुरेसा पुरवठा होत नसल्याने ४५ वयोगटापुढील नागरिकांनाच डोस देण्याचा निर्णय घेण्यात आला. डोस उपलब्ध होत नव्हते, त्यावेळी नागरिक पहाटेपासून लसीकरण केंद्रांवर रांगा लावत होते. नगरसेवकदेखील प्रचाराचा भाग म्हणून लसीकरण केंद्रे मागून घेत होते.
परंतु, लसीकरण केंद्रावर तासाभरातच उपलब्ध होत असलेली लस संपत होती. त्यावेळी मोठ्या प्रमाणात शासन व महापालिकेच्या यंत्रणेवर टीका होत होती. परंतु, दररोज लस उपलब्ध होवू लागली. या वेळी नागरिकांना लसीकरणाकडे पाठ फिरविली.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
चिंताजनक: नाशिकमध्ये परदेशातून इतक्या नागरिकांचे आगमन; नाशिक महापालिका हाय अलर्टवर!
नाशिक जिल्ह्यात बुधवारी (दि. १ डिसेंबर २०२१) कोरोना रुग्णांमध्ये काही प्रमाणात वाढ; इतके मृत्यू
आनंददायक: नाशिक-कल्याण मेमू लोकल लवकरच.. या महिन्यात होणार चाचणी !