नाशिक: बिटकॉइनमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून सराफी महिलेला तब्बल १५ लाखांचा गंडा

नाशिक: बिटकॉइनमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून सराफी महिलेला तब्बल १५ लाखांचा गंडा

नाशिक (प्रतिनिधी): नायजेरियन व्यक्तीने शहरातील सराफ व्यावसायिक महिलेला सोशल मीडियावर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवत आंतरराष्ट्रीय सराफी व्यवसाय करण्याचे आमिष दाखवले तसेच बिटकॉइन या आभासी चलनात गुंतवणूक करण्यास सांगितले.

बिटकॉइनमध्ये गुंतवणूक करण्यासाठी सोन्याची चेन तसेच विविध बँक खात्यात पैसे भरल्याने सुमारे १५ लाख ५७ हजारांचा गंडा या महिलेला घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

हे ही वाचा:  नाशिक: थंडीचा कडाका वाढला; पारा १२.४ अंशांपर्यंत घसरला

याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती आणि सराफ व्यावसायिक महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, अनोळखी व्यक्तीने सोशल मीडियावर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. मैत्री झाल्यानंतर वैयक्तिक मोबाइल नंबर घेत बोलणे सुरू केले. एकमेकांची व्यावसायिक माहिती घेतली. संशयिताने पीडित महिलेचा सराफ व्यवसाय असल्याचे समजताच महिलेला विविध आमिषे देत सराफ व्यवसायाला जागतिक संधी आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तुमचा व्यवसाय वाढेल असे सांगत बिटकॉइन या आभासी चलनात गुंतवणूक करण्यास सांगितले. महिलेने संशयिताला सकारात्मक प्रतिसाद दिल्यानंतर संशयिताने तुमच्याकडे असलेल्या सोन्याच्या चेन पाठवा असे सांगितले. दिल्ली येथे भेटण्यास बोलावले व एका पंचतारांकित हॉटेलमध्ये भेट घेत महिलेकडील सहा सोन्याच्या चेन घेतल्या. दोन दिवसांनी संशयिताच्या नंबरवर संपर्क साधला असता फोन बंद असल्याचे समजले. एक-दोन वेळा प्रयत्न केला मात्र प्रतिसाद मिळाला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. संशयिताच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790