नाशिक: बसमध्ये बसण्यास जात असलेला प्रवासी बसच्याच धडकेने ठार

नाशिक: बसमध्ये बसण्यास जात असलेला प्रवासी बसच्याच धडकेने ठार

नाशिक (प्रतिनिधी): बसमध्ये बसण्यास जात असलेल्या प्रवाशाला बसचाच धक्का लागल्याने झालेल्या अपघातात प्रवासी ठार झाला.

द्वारका बस थांब्यावर हा अपघात घडला.

भद्रकाली पोलिस ठाण्यात बसचालकाच्या विरोधात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

⚡ हे ही वाचा:  नाशिकमध्ये जोरदार पावसाची हजेरी; तीन तासांत १०.४ मिमी पावसाची नोंद, आज (दि. २६) यलो अलर्ट कायम

पोलिसांनी दिलेली माहिती व मनीष शेकटकर (रा. काठे गल्ली) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, वडील ओंकार रामचंद्र शेकटकर (८७) बस थांब्याकडे जात असताना संशयित बस एमएच ४० बीएल ९७६८ द्वारकाकडून सर्व्हिसरोडने औरंगाबादकडे प्रवासी घेऊन जाणारी बस आयप्पा मंदिराजवळ बस थांब्यावर प्रवासी बसवून भरधाव जात असताना शेकटकर यांना धडक दिली.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ओझर विमानतळावर आगमन

[wpna_related_articles title=”More Important News” ids=”8810,8790,8787″]

या धडकेत ओमकार शेकटकर यांच्या डोक्यास गंभीर मार लागला. त्यांना रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. बसचालक मेहबूब इसाक शेख (रा. वैजापूर) याच्याविरोधात भद्रकाली पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
here