नाशिक (प्रतिनिधी): देशातील शहरांच्या सुनियोजित विकासासाठी बांधकाम व्यवसायिकांनी पुढाकार घेऊन नेतृत्वकरण्याची गरज असून यातूनच अनेक नवीन संधी निर्माण करता येऊ शकतात असे प्रतिपादन क्रेडाईचे राष्ट्रीय अध्यक्ष सतीश मगर यांनी केले आहे. क्रेडाई महाराष्ट्रकडून आयोजितकरण्यात आलेल्या क्रेडाई राष्ट्रीय शिखर परिषद २०२१च्या निमित्ताने घेण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत ते बोलत होते.
यावेळी क्रेडाई राष्ट्रीय अध्यक्ष सतिश मगर, क्रेडाई राष्ट्रीय सल्लागार जितुभाई ठक्कर, क्रेडाई राष्ट्रीय उपाध्यक्ष शांतीलाल कटारिया, क्रेडाई राष्ट्रीय खजिनदार अनंत राजेगावकर, क्रेडाई महाराष्ट्र अध्यक्ष राजीव पारीख, क्रेडाई महाराष्ट्र सचिव सुनील कोतवाल, क्रेडाई नाशिक अध्यक्ष रवी महाजन उपस्थित होते.
देशातील अनेक शहरे आज विकासाच्या महत्वाच्या टप्प्यात आहे. या शहरांच्या विकासात बांधकामव्यवसायिक नक्कीच महत्वाची भूमिका बजावत आहेत. ही गोष्ट लक्षात घेऊन आपल्यावर मोठी जबाबदारी असून यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे. यातून विकासाचे काम करत असतांना शहर घडवून शहराला ओळख मिळवून देण्याचे काम सुद्धा बांधकाम व्यवसायिक करत असल्याचे मगर यांनी यावेळी सांगितले.
शिखर परिषदेची माहिती देतांना त्यांनी सांगितले की, क्रेडाईचे ५७ शहरांमधून काम सुरुअसून सुमारे १०० हून अधिक क्रेडाई शहराध्यक्ष परिषदेमध्ये सहभागी झाले आहेत. क्रेडाईच्या शहरसंघटनांना स्वयंपूर्ण होण्यासाठी आणि तेथील सदस्यांमध्ये नेतृत्वगुण निर्माण करूनत्यांना प्रभावी बनविण्याच्या उद्देशाने त्यांच्याशी संवाद साधणे हा परिषद घेण्यामागचा प्रमुख हेतू आहे.
क्रेडाईची आतापर्यंतची वाटचाल अतिशय विश्वासपूर्ण झालेली आहे. समाजात बांधकाम व्यवसायिकांची प्रतिमा उंचावण्यासोबतच लोकांसोबतचा संवादही सकारात्मकरीत्या वाढला आहे. बांधकामक्षेत्रासोबतच समाजाच्या विकासातही क्रेडाई महत्वाची भूमिका बजावत असल्याचे क्रेडाईराष्ट्रीय उपाध्यक्ष शांतीलाल कटारिया यांनी सांगितले.
बनूया, शहराचे शिल्पकार: सुनील कोतवाल
एखादे शहरनिर्माण करतांना त्या भागातील बिल्डर अर्थात बांधकाम व्यवसायिक फक्त घरे बांधतनाही. तर संपूर्ण शहरच उभारत असतो. आपल्या बांधकामातून विविध सोईसुविधा निर्माणकरून एक संस्कृतीचीही पायाभरणी त्याच्याकडून होते. एकूणच त्याचे असलेले महत्वलक्षात घेऊन त्याने शहराचा कुटुंबप्रमुख म्हणून नेतृत्व करणेही यात अपेक्षित आहे.याचकरिता शिखर परिषदेच्या माध्यमातून नेतृत्व कौशल्य विकसित करण्यावर भर दिला जात आहे. काम करतांना, कामात स्पष्टता, सुसूत्रता आणून एक व्यक्ती आणि एकनेता म्हणून घडवण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. जेणेकरून आपण शहराचे शिल्पकार बनू आणि आपली अशीच प्रतिमा नक्कीच तयार करू.
शिखर परिषदेचे मुख्य उद्देश:
१.शहराध्यक्षांच्या नेतृत्वाच्या क्षमता वाढवणे
२.उत्तम भविष्य घडवण्यासाठी दृष्टीकोन तयार करणे
३.या व्यवसायातील नवीन प्रवाह,विचार, पद्धती सर्वांपर्यंत पोहोचवणे
४.शहराध्यक्षांचे अनुभव वाढवून त्यांच्या व्यक्तिमत्वात वैविध्यता आणणे.
५.क्रेडाईच्या विविध शाखांमध्ये नेतृत्व संस्कृती निर्माण करणे.
६.शहराचा, समूहाचा व क्रेडाई चा विकास तसेच या व्यवसायातील मरगळ दूर सारून, उत्साह निर्माण करून,व्यवसायात स्थैर्य आणि सातत्यआणण्यासाठी चर्चा आणि विनिमय करण्यासाठीची ही परिषद.
७.क्रेडाई फेडरेशन एक सशक्त संघटना म्हणून बांधणे.
८.२०२१ – २०२२ या वर्षांसाठीची ध्येय निश्चिती करून, समान ध्येयाकडे वाटचाल करणे.
९.बांधकाम व्यवसायिकांमध्ये नीतिमूल्ये रुजवून कामाप्रती प्रतिष्ठा बाळगून, सतत होणाऱ्या टीकांवर मात करणे.