नाशिक (प्रतिनिधी) : शहर व परिसरात अंमली पदार्थांची तस्करी होत असलेल्या घटना रोखण्यासाठी प्रशासन यंत्रणा कठोर पाऊले उचलत आहे. माडसंगवी येथे जवळपास साडेसहा लाखांचे अंमली पदार्थ काल पकडण्यात आले. हे पकडण्यासाठी पोलीस पाटील कृष्णा गरड यांनी दाखविलेली जागरूकता महत्त्वाची आहे.
यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी शुभेच्छापत्र आणि पुष्पगुच्छ देऊन पोलीस पाटील श्री.कृष्णा गरड यांचा सत्कार केला. पुढे बोलताना जिल्हाधिकारी श्री.मांढरे म्हणाले, समाजाचे रक्षण करण्यासाठी प्रशासनातील प्रत्येक अधिकारी, कर्मचारी जबाबदारीने काम करत असतो. सर्वच स्तरावर वेगवेगळे नियोजन करून प्रयत्न केले जात आहेत. शहरात अंमली पदार्थ मुख्यतः महामार्गावरून येत असतात; महामार्गावरील गावे तेथील पोलीस यंत्रणा, ग्राम यंत्रणा सक्षम असल्याचे पोलीस पाटील गरड यांनी दाखवून दिले आहे.
माडसंगवीचे पोलीसपाटील कृष्णा गरड हे सकाळी कामानिमित्त प्रवास मरत असताना त्यांना त्यांना काही लोक दिसले त्यांच्या संशयित हालचालींवरून त्यांना विचारले असता त्यांनी सुरुवातीला दमबाजी सुरू केले. प्रसंगावधान राखत गरड यांनी पोलिसांना कळविले. मात्र, संशयित पळून जाण्यात यशस्वी झाले. पोलिसांना मिळालेल्या बॅग मध्ये गांजा नामक अमली पदार्थ होते. पोलीस पाटील गरड यांनी दाखविलेले प्रसंगावधान आणि जागरूकता अनुकरणीय असून जिल्ह्यातील सर्व पोलीस पाटील यांनी अशाप्रकारे काम करावे असेही जिल्हाधिकारी मांढरे यांनी सांगितले.