
नाशिक। दि. २६ जानेवारी २०२६: देशाच्या 77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सोमवारी सकाळी विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी पोलिस दलाच्या तुकडीने मानवंदना दिली.
यावेळी अपर आयुक्त सर्वश्री सुभाष बोरकर, अजय मोरे, जितेंद्र वाघ, अरविंद लोखंडे, उपायुक्त उज्ज्वला बावके, सहायक आयुक्त विठ्ठल सोनवणे, तहसीलदार पल्लवी जगताप यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी ध्वजारोहण समारंभानंतर मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्ताने विभागीय आयुक्त कार्यालय आणि महाराष्ट्र साहित्य परिषद नाशिकरोड शाखा यांच्या वतीने आयोजित शुद्धलेखन व सुंदर हस्ताक्षर स्पर्धा आणि मराठी भाषा ज्ञान स्पर्धेतील विजेत्यांना विभागीय आयुक्त डॉ. गेडाम यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.
मराठी भाषा ज्ञान स्पर्धेत आराध्या वडनेरे (प्रथम क्रमांक), आर्य गलांडे (द्वितीय), श्रद्धा गगनबिडे (तृतीय) आणि पूर्व तेलंगी, आर्या बोराडे, आविष्का टावरे, श्रुतिका सोनार, तन्मय आगळे यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. तर, शुद्धलेखन व सुंदर हस्ताक्षर स्पर्धेत श्रद्धा पगार (प्रथम), ईश्वरी ताजनपुरे (द्वितीय), आर्य गलांडे (तृतीय) आणि पूर्वा ढेरिंगे, दिव्या खैरनार, कल्याणी गोसावी, रेणुका कासार आणि पीयूष माळवे यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
यावेळी विभागीय आयुक्त डॉ. गेडाम यांच्या हस्ते मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्ताने विभागीय आयुक्त कार्यालय आणि महाराष्ट्र साहित्य परिषद नाशिकरोड शाखा यांच्या वतीने आयोजित ग्रंथप्रदर्शन आणि मराठी खाद्य पदार्थ मेळाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानिमित्त उभारण्यात आलेल्या सेल्फी पॉईंटलाही मान्यवरांनी भेट देत छायाचित्र काढून घेतले. विभागीय आयुक्त डॉ . गेडाम यांनी यावेळी उपस्थितांना शुभेच्छा दिल्या.
![]()


