नाशिक। दि. २७ सप्टेंबर २०२५: जिल्ह्यातील सर्व शासकीय, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित महाविद्यालयांनी सन 2024-25 व त्यापूर्वीचे प्रलंबित असलेले इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागासस प्रवर्गातील भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण व परीक्षा शुल्क योजनेचे अर्ज तात्काळ निकाली काढावेत, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण, नाशिक चे सहाय्यक संचालक संतोष चव्हाण यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती, व विशेष मागास प्रवर्गातील भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण व परीक्षा शुल्क योजनेचे अर्ज विविध कारणांमुळे महाविद्यालय स्तरावर प्रलंबित आहेत. महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी प्रलंबित अर्जांमधील त्रुटींचे निराकरण करून पात्र अर्ज विहित मुदतीत महाडिबीटी पोर्टलवरून निकाली काढावयाचे आहेत.
विहित मुदतीत अर्ज निकाली न निघाल्यास, असे अर्ज महाडिबीटी प्रणालीमधून कायमस्वरूपी रद्द होणार आहेत. रद्द होणाऱ्या अर्जांची जबाबदारी संबंधित महाविद्यालयांची राहील याची दखल घ्यावी. तसचे सन 2025-26 या वर्षातील शिष्यवृत्तीचे अर्ज महाविद्यालय स्तरावर मोठ्या प्रमाणावर प्रलंबित असून हे अर्ज देखील महाविद्यालयांनी निकाली काढण्याचे आवाहन सहाय्यक संचालक श्री चव्हाण यांनी केले आहे.
![]()
नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा...
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790