
नाशिक। दि. १५ जुलै २०२५: चहा विक्रेत्याला चाकूचा धाक दाखवत ४३०० रुपये लुटणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली. अंबड पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने ही कारवाई केली. कुणाल सोपान मोरे, देवेश उर्फ देवा योगराज पाटील असे या संशयितांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ९ जुलै रोजी रोहन बाळू वाकड (१८ हा पवननगर) येथे दुकानात चहा विक्रीसाठी जात असताना समोरून आलेल्या दुचाकीवरील ३ तरुणांनी जवळ येऊन चहा मागितला. चहा नसल्याचे सांगत चहा नाही तर तुझ्या खिशातील असलेले पैसे आम्हाला दे असे बोलून दुचाकीहून उतरुन चाकूचा धाक दाखविला. मानेला चाकू लावून खिशातील रक्कम लुटून नेली होती. या गुन्ह्याचा तपास सुरू असताना उत्तमनगर येथे दोन संशयित (एमएच १५ जे.जी. ७२६०) गाडीवरून येताना दिसले. संशयितांना थांबवत चौकशी केली. वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड, विलास पडोळकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.