नाशिक, दि. 14 जुलै, 2025 (जिल्हा माहिती कार्यालय): मुलींच्या सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था, नाशिक येथे तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पद्धतीने शारीरिक प्रशिक्षण निदेशक (पुरूष) 1 पद, ग्राऊंडसमन 1 पद व शिपाई 1 पद भरतीसाठी शुक्रवार 18 जुलै 2025 रोजी सकाळी 11 वाजता मुलाखतीचे आयोजन केले आहे. पात्र इच्छुकांनी मुलींची छात्रपूर्व सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था, सैनिकी मुलांचे वसतिगृह, पत्रकार कॉलनी , त्र्यंबक रोड,शासकीय डेअरी समोर वेळेत उपस्थित रहावे, असे आवाहन संस्थेच्या संचालक मेजर (निवृत्त) एस. फिरासत यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
वरील पदे ही महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ यांच्यामार्फत भरली जाणार आहेत.प्रशिक्षण निदेशक (पुरूष) पदासाठी उमेदवार पदवी/ पदवीत्तर असावा. माजी सैनिक व सैन्यातील शारीरिक प्रशिक्षणाचा अनुभव असल्यास प्राधान्य आहे. ग्राऊंडसमन पदासाठी उमेदवार इयत्ता 10 वी पास असावा तसेच खेळाच्या मैदानाची देखभाल व दुरूस्ती करणे या कामांचा अनुभव असणे आवश्यक आहे तर शिपाई पदासाठी इयत्ता 10 वी पास आणि माजी सैनिक असल्यास प्राधान्य असणार आहे.
याबाबत अधिक माहितीसाठी मुलींची सेवापूर्व शिक्षण संस्थेचा 9703548457 व 9421004794 या क्रमांकावर संपर्क साधावा, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.