नाशिक: सोमवारी (दि. १४) विभागीय लोकशाही व महिला लोकशाही दिनाचे आयोजन

नाशिक। दि. १३ जुलै २९२५: येथील विभागीय आयुक्त कार्यालयात सोमवार, दिनांक १४ जुलै, २०२५ रोजी विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती विभागीय महसूल अपर आयुक्त जितेंद्र वाघ यांनी दिली आहे.

नाशिक रोड येथील विभागीय आयुक्त कार्यालय येथे सकाळी ११ वाजता होणारा विभागीय लोकशाही दिन कार्यक्रम विभागातील सर्व विभाग प्रमुखांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे. जिल्हास्तरावरील लोकशाही दिनात दाखल झालेली प्रकरणांबाबत तक्रारदार समाधानी नसतील तर तेच या लोकशाही दिनामध्ये अर्ज दाखल करु शकतात.

👉 हे ही वाचा:  नाशिक: पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे 16 जुलै रोजी आयोजन

विभागीय महिला लोकशाही दिन
दरम्यान, याच वेळेस विभागीय महिला लोकशाही दिनाचेही आयोजन करण्यात आले आहे. महिलांच्या तक्रारी, अडचणी यांची शासकीय यंत्रणेद्वारे सोडवणूक करण्यासाठी या दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. यापूर्वी ज्या समस्याग्रस्त व पीडित महिलांनी तालुकास्तर व जिल्हास्तरावर महिला लोकशाही दिनात अर्ज केलेले असतील व त्यांच्या समस्येचे उत्तर मिळाले नसेल, त्यांनी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे टोकन नंबरसह त्यांचे अर्ज दिनांक १४ जुलै रोजी विभागीय महिला लोकशाही दिनात सकाळी ११ वाजता सादर करावेत, असे आवाहन चंद्रशेखर पगारे, विभागीय उपायुक्त, महिला व बालविकास विभाग, नाशिक यांनी केले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790