नाशिक। दि. ८ जुलै २०२५: शहराला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण ६१.६२ टक्के भरले असून गतवर्षीपेक्षा हा साठा ३६.८ टक्क्यांनी अधिक आहे. ३७ दिवसांत धरणातून ५६६३.३६८ अब्ज लिटर (२ टीमसी) पाण्याचा विसर्ग झाला आहे.
गतवर्षी एवढा विसर्ग ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात झाला होता. सोमवारीही धरणातील विसर्ग ११५० ने वाढ करुन तो ६३३६ क्यूसेक करण्यात आल्याने गोदावरीची पातळी वाढली असून दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी लागले आहे.
दारणा ६८.८५ टक्के भरले: गतवर्षी २२.५१%, यंदा ४६% अधिक विसर्गात १७०४ ने वाढ. १३, १६० क्यूसेक.
जिल्ह्यातील २६ प्रकल्पात ६२.७५ टक्के साठा: गतवर्षी १०.७१%. यंदा ५१% अधिक
३७ दिवसांत तिप्पट पाऊस:
शहरात १ जून ते ७ जुलैपर्यंत ५०० मिलिमीटरहून अधिक पाऊस झाला. गतवर्षी तो तिपटीने कमी म्हणजे केवळ १९८ मिलिमीटर झाला होता. सोमवारीही शहरात १२ तासांत २०.० मिलिमीटर पाऊस झाला. जिल्ह्यात ७ जुलैपर्यंत सरासरी २२६.६ मिलिमीटर पाऊस होतो. यंदा तो ४८८.८ मिलिमीटर झाला.