नाशिक। दि. ७ जुलै २०२५: महावितरणच्या नाशिक शहर विभाग २ अंतर्गत असलेल्या द्वारका उपविभागातील इंदिरा नगर कक्षाअंतर्गत असलेल्या शिवाजीवाडी विद्युत उपकेंद्रातून निघणाऱ्या भारत नगर, कल्पतरू नगर, डीजीपी नगर या ११ केव्ही उच्चदाब विद्युत वाहिन्याअंतर्गत असलेल्या विद्युत वाहिन्या भूमिगत करण्यात येणार असून रस्त्याच्या मध्ये असलेले विद्युत खांब व रोहित्र नाशिक स्मार्ट सिटीच्या वतीने स्थलांतरित करण्यात येणार आहे.
त्यामुळे दिनांक 8 ते 10 जुलै 2025 पर्यंत सलग दररोज सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत तसेच शनिवार दिनांक 12 जुलै रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत वीजपुरवठा बंद राहणार आहे. तरी ग्राहकांनी याची नोंद घ्यावी व सहकार्य करावे असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
⚡ नाशिक स्मार्ट सिटी विद्युत संदर्भात करीत असलेल्या या कामामुळे खालील भागात वीज पुरवठा बंद राहणार आहे.
👉 ११ केव्ही भारत नगर वाहिनी अंतर्गत: खोडे नगर , विठ्ठल मंदिर, वडाळा गाव, गणेश नगर, रहमत नगर, रविशंकर मार्ग.
👉 ११ केव्ही कल्पतरू नगर वाहिनी अंतर्गत: अशोका मार्ग, गोदावरी नगर, कुरुडकर नगर, बनकर मळा, मातोश्री कॉलनी, निसर्ग कॉलनी, पखाल रोड, गोरे हॉस्पिटल, विधाते नगर, विठ्ठल मंदिर, पंडित रविशंकर मार्ग.
👉 ११ केव्ही डीजीपी नगर वाहिनीअंतर्गत: साई संतोषी नगर, एस एन पार्क, साठे नगर, मदिना नगर ,सादिक नगर, गुलशन नगर मुमताज नगर, म्हाडा कॉलनी, वडाळा गाव, मेहबूबनगर या भागात सदर वेळेत वीज पुरवठा बंद राहणार आहे.
वीज वाहिनी भूमिगत करण्याचे काम नियोजित वेळेअगोदर पूर्ण झाल्यास वीज पुरवठा तत्काळ सुरू करण्यात येईल. तरी संबंधित ग्राहकांनी याची नोंद घ्यावी व सहकार्य करावे असे आवाहन महावितरणच्या शहर विभाग २ कडून करण्यात आले आहे.