नाशिक: दुचाकीवर जाणाऱ्या इसमाचा धारदार शस्त्राने खून; दोघे ताब्यात

नाशिक (प्रतिनिधी): शहर व परिसरात खुनाचे सत्र सुरूच सातपूरच्या प्रबुद्धनगरात किरकोळ कारणातून रविवारी (दि.४) मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास दुचाकीवरून जाणाऱ्या इसमाचा धारदार शस्त्राने खून करण्यात आल्याची घटना सोमवारी (दि. ५) सकाळी उघडकीस आली. संजय पुंडलिक जाधव (रा. अशोकनगर) असे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: प्रेयसीच्या पतीचा खून करून फरार झालेल्या प्रियकरासह त्याच्या मित्राला अटक !

प्रबुद्धनगरातील महालक्ष्मी चौक परिसरात रविवारी मध्यरात्री खुनाची घटना घडली. सोमवारी सकाळी स्थानिक नागरिकांनी मृतदेह पडलेला बघितल्यानंतर सातपूर पोलिसांना माहिती कळविण्यात आली. यानंतर पोलिस उपायुक्त मोनिका राऊत, सहायक पोलिस आयुक्त शेखर देशमुख, वरिष्ठ पोलिस निरीक्षक रणजित नलवडे यांनी घटनास्थळी धाव घेतली.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: भरधाव मोटारसायकलच्या धडकेत २४ वर्षीय युवतीचा मृत्यू

हल्लेखोरांनी जाधव यांच्या शरीरावर एकापेक्षा जास्त वार करत निघृणपणे खून केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. पोलिसांनी वेगाने तपासचक्रे फिरवून सीसीटीव्ही फुटेज तपासून संशयित अमित जाधव (२५, रा. सातमाऊली चौक, श्रमिकनगर), अनिल गांगुर्डे (३०, रा. प्रबुद्धनगर) या दोघा संशयितांना ताब्यात घेतले आहे. मयत संजय पुंडलिक जाधव हे सातपूर औद्योगिक वसाहतीतील सीएट कंपनीत अनेक वर्षांपासून नोकरीला होते. अत्यंत शांत व मृदू स्वभावाच्या व्यक्तीचा अशाप्रकारे खून करण्यात आल्याच्या घटनेने परिसरात हळहळ व संताप व्यक्त केला जात आहे.

Loading

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
here