नाशिक (प्रतिनिधी) : नाशिक शहरातील गंगापूर धरण हे ९९%भरले असून त्यातून विसर्ग वाढविला जाण्याची शक्यता आहे. तसेच गिरणा धरण सुद्धा ९५% भरले आहे. त्यामुळे मालेगाव व खानदेश पट्ट्यातील पाण्याची समस्या मिटली आहे असं म्हणायला हरकत नाही. जिल्हातील धरणांमधील एकूण जलसाठा ६० हजार २६६ दशलक्ष घनफूट म्हणेच ९२ टकक्यांपर्यंत पोहोचला आहे. जिल्ह्यात २४ धरणांची एकूण पाणीसाठवण क्षमता ही ६५ हजार ८१८ दशलक्ष घनफूट एवढी आहे.
भरले असून त्यातून विसर्ग वाढविला जाण्याची शकत्या आहे. तसेच गिरणा धरण सुद्धा ९५% भरले आहे. त्यामुळे मालेगाव व खानदेश पट्ट्यातील पाण्याची समस्या मिटली आहे असं म्हणायला हरकत नाही. जिल्हातील धरणांमधील एकूण जलसाठा ६० हजार २६६ दशलक्ष घनफूट म्हणेच ९२ टकक्यांपर्यंत पोहोचला आहे. जिल्ह्यात २४ धरणांची एकूण पाणीसाठवण क्षमता ही ६५ हजार ८१८ दशलक्ष घनफूट एवढी आहे.
गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पाऊस सुरू असल्यामुळे धरणांमधील पाण्यात मुबलक प्रमाणात वाढ झाल्याने शहरवासी चिंता मुक्त आहेत. नाशिक जिल्ह्यातील सर्वांत मोठे धरण अशी ओळख असलेला गिरणा धरण आता ९५% भरला असून १८हजार ५००दशलक्ष घनफूट एवढी या धरणाची पाणीसाठवण क्षमता आहे. मागच्या वर्षी सप्टेंबरपर्यंत या धरणात १६ हजार ३८३ दशलक्ष घनफूट म्हणजेच ८९% पाणीसाठा होता. आता या धरणात सहा टक्के अधिक म्हणजेच अर्थात् ९५ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.
जिल्हा प्रशासनाने माहिती देत हरणबारी, केळझर आणि चणकापुर ही धरणे देखील १०० टक्के भरल्याचे सांगितले. भावली, वालदेवी, कडवा, भोजपुर, हरणबारी, केळझर, नागासाक्या व माणिक पुंज ही धारणेसुद्धा १०० टक्के भरली आहेत. दारणा व गोदावरी खोऱ्यातील धरणांमधून सुरू असलेला विसर्ग पाहता नांदूर मध्यमेश्वरचे दरवाजे आधीच खुले केले आहेत. सद्यस्थितीला गंगापूर, दारणा, भावली, वालदेवी, कडवा, नांदूरमध्यमेश्वर, भोजपुर, चणकापूर, हरणबारी, केळझर आणि पूनद या धरणांमधून विसर्ग सुरू आहे. नांदूर मध्यमेश्वर मधून २५ टीएमसी पाणी मराठवाड्यातील जायकवाडी धरणात सोडण्यात आले आहे. मनमाड येथील वागदर्डी धरण सुद्धा ‘ओव्हर फ्लो’ होऊन मनमाड करांची पाणीटंचाई दूर झाली आहे.