नाशिक: शिक्षिकेने विद्यार्थ्यांच्या मित्रांना दिली प्रियकराला मारण्याची सुपारी

नाशिक (प्रतिनिधी): पंचवटी दिंडोरी रोडवरील मेरी वसाहतीतील पंजाबराव देशमुख वसतिगृह समोर एका युवकाचा डोक्यात धारदार शस्त्राने वार करत खून करण्यात आल्याची घटना आज (दि. २१ ऑगस्ट) सकाळी उघडकीस आली होती.

या हत्या प्रकरणाचा उलगडा पंचवटी पोलिसांनी अवघ्या पाच तासांमध्ये केला आहे. प्रेयसीने सतत होणाऱ्या त्रासाला कंटाळून प्रियकराची ही हत्या सुपारी देऊन केल्याचे तपासात उघड झाले आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, नाशिक मधील पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये असलेल्या तारवाला नगर येथे आज सकाळी निवृत्त पोलीस कर्मचारी प्रवीण कोकाटे यांचा मुलगा गगन कोकाटे याची दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना समोर आली होती. यानंतर घटनास्थळी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट दिली आणि या घटनेचा गुन्हा दाखल करून तपास सुरू झाला होता.

पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे अवघ्या पाच तासांमध्ये या प्रकरणाचा तपास पोलिसांनी पूर्ण केला. प्रविण शहाजी कोकाटे (रा-प्लॉट नं ४८, राधेश्याम बंगला वृंदावन नगर, म्हसरूळ नाशिक) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पंचवटी पोलीस ठाणे येथे खुनाचा गुन्हा दाखल होता.

हे ही वाचा:  नाशिक: जुन्या मध्यवर्ती बसस्थानकाचे आता रूपडे पालटणार

या गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त प्रशांत बच्छाव, किरणकुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीमती प‌द्मजा बडे, संदिप मिटके यांनी घटनास्थळी भेट देवुन गुन्हयातील आरोपीतांचा शोध घेवुन गुन्हा उघडकीस आणणेबाबत पंचवटी पोलीस ठाणे व गुन्हे शाखेचे पोलीस पथक यांना सुचना देवुन मार्गदर्शन केले होते. गुन्हे शाखा युनिट क १ चे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी या घटनास्थळास तात्काळ भेट दिली आणि तपासाची चक्रे फिरवली.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे आरोपी हे अशोकनगर सातुपर, नाशिक भागातील असल्याबाबत माहिती मिळाल्याने सदर आरोपींची नावे निष्पन्न केली.

हे ही वाचा:  नाशिक: विस्कळीत पाणीपुरवठ्यावरून मनपा-महावितरणमध्ये दावे-प्रतिदावे

सदर गुन्ह्यातील आरोपी हे अशोकनगर, सातपुर भागात असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, गजानन इंगळे, रविंद्र बागुल, प्रविण वाघमारे, विशाल काठे, नाझीमखान पठाण, प्रशांत मरकड,  देविदास ठाकरे, महेश साळुंके, प्रदिप म्हसदे, शरद सोनवणे, धनंजय शिंदे,  योगीराज गायकवाड, रमेश कोळी,  राजेश लोखंडे, पोना विशाल देवरे,  मिलिंदसिंग परदेशी, विलास चारोस्कर,  नितीन जगताप, आप्पा पानवळ, मुक्तार शेख, राम बर्डे, अमोल कोष्टी, जगेश्वर बोरसे, समाधान पवार, अनुजा येलवे,  किरण शिरसाठ, सुकाम पवार तसेच पंचवटी पोलीस ठाणे कडील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संपत जाधव, पोलीस कर्मचारी कैलास शिंदे, महेश नांदुर्डीकर, सागर कुलकणी, रोहिणी भोईर अशांची वेगवेगळी पथके तयार करून वरिष्ठांचे परवानगीने आरोपीतांचा शोध घेण्याकामी शासकीय वाहनांनी सातपुर भागात रवाना केली.

या पथकांनी अशोकनगर, श्रमिकनगर, सातपुर भागातुन आरोपी नामे संकेत शशिकांत रणदिवे, (वय-२०, रा. रो हाउस नं ३, राधाकृष्णनगर बोरकर व्हॉली, अशोकनगर सातपुर), मेहफुज रशिद सैयद, (वय-१८, रा-पाण्याच्या टाकी समोर, बोरकल व्हॉली चौकी जवळ, अशोकनगर सातपुर नाशिक), रितेश दिलीप सपकाळे, (वय २०, रा रा-पाण्याच्या टाकी समोर, बोरकल व्हॉली चौकी जवळ, अशोकनगर सातपुर नाशिक), गौतम सुनिल दुसाने, (वय १८, रा. शहीद सर्कल गंगापुर वाईनच्या मागे, गंगापुररोड नाशिक) आदींना ताब्यात घेवुन त्यांना खुनातील गुन्ह्याबाबत विचारपुस केली असता त्यांनी मयत गगन प्रविण कोकाटे यास जिवे ठार मारण्यासाठी भावना सुशांत कदम, (रा. वृंदावन नगर, म्हसरूळ नाशिक) हिने दोन लाख रूपये देवुन जिवे ठार मारण्याची सुपारी दिल्याबाबत सांगुन गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. विशेष म्हणजे ही महिला विवाहित आहे. गगनच्या त्रासाला कंटाळून तिने हे पाऊल उचलल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी गुन्ह्यामध्ये आरोपींना अटक करून पुढील तपास पंचवटी पोलीस करत आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790