नाशिक: गॅस कनेक्शन बंद होण्याच्या लिंकद्वारे खाते हॅक; ग्राहकाला ६ लाखाला गंडा

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): एमएनजीएलचे गॅस कनेक्शन बंद होणार असल्याचे सांगत कनेक्शन कायम ठेवण्याकरता केवायसी अपडेट करण्यास सांगत लिंक पाठवली गेली. लिंक ओपन केल्यानंतर काही वेळात डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे खात्यातून ६ लाखांची रक्कम काढून घेतल्याचे लक्षात येताच सायबर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: प्रेयसीच्या पतीचा खून करून फरार झालेल्या प्रियकरासह त्याच्या मित्राला अटक !

अशाचप्रकारे ११ ग्राहकांनी पोलिसांत तक्रार केली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती आणि देशमुख (रा. गंगापूररोड) यांच्या तक्रारीनुसार, त्यांच्या वडिलांना एमएनजीएलमधून बोलत असल्याचे सांगत तुमचे गॅस कनेक्शन केवायसी अपडेट नाही. बिल भरले नसल्याचे दिसत नाही.

⚡ हे ही वाचा:  स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टाने दिली ‘ही’ शेवटची तारीख !

त्यासाठी आलेल्या लिंकवर देशमुख यांनी क्लिक करताच संशयितांनी मोबाइल आणि बँक खाते हॅक करत डेबिट कार्डमधून ४ लाख, क्रेडिट कार्डचे २ लाख अशा रकमेद्वारे मुंबईमध्ये दोन मोबाइल आणि अन्य खरेदी केल्याचे समजले.

⚡ हे ही वाचा:  मोठी बातमी! आयटीआर फायलिंगला मुदतवाढ, करदात्यांना मोठा दिलासा

एमएनजीएलच्या N ऐवजी M:
हॅकरने एमएनजीएल नावाचे हुबेहुब संकेतस्थळ तयार केले. मात्र त्यात एनच्या जागी एम वापरत लिंक पाठवली आणि देशमुख फसले.

Loading

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
here