नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): पिंपळगाव परिसरातील आहेरगाव येथील शेतकरी दत्तु पुंजा रसाळ (६०), प्रशांत दिनकर गांगुर्डे व शाम त्र्यंबक गांगुर्डे यांच्यावर बिबट्याने गुरुवार (दि.१२) रोजी सकाळी ८ वाजून ३० मिनिटांच्या सुमारास जोरदार हल्ला केला या हल्यात दत्तू रसाळ मोठ्या प्रमाणात जखमी झाले असून त्यांच्यावर नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
पिंपळगाव परिसरात असलेल्या आहेरगाव शिवारात गुरुवार (दि.१२) रोजी सकाळी साडे आठ च्या सुमारास नेहमीप्रमाणे शिंदे गांगुर्डे वस्तीवर शेतकरी दत्तु रसाळ हे आपल्या द्राक्ष बागेत काम करत असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्याच्यावर अचानक हल्ला केला यात रसाळ यांच्या हाताला पायला दुखापत झाली अचानक आवाज झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी बागेत धाव घेतली व बिबट्याला पळवून लावले.
रसाळ यांच्यावर झालेल्या हल्यानंतर एक तासातच शेतात जाणाऱ्या प्रशांत दिनकर गांगुर्डे व शाम त्र्यंबक गांगुर्डे यांच्यावर बिबट्याने हल्ला केला यात दोघेही किरकोळ जखमी झाले. जखमीना पिंपळगावच्या आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणले तेथे प्राथमिक उपचार केले. तसेच जास्त जखमी असणाऱ्या दत्तू रसाळ यांना पुढील उपचारासाठी नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
आमदार दिलीप बनकर यांनी त्याची भेट घेत विचारपूस केली. घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. सदर नरभक्षक बिबट्याचा ताबडतोब बंदोबस्त करण्याची व त्यासाठी पिंजरा लावण्याबरोबरच त्याचा शोध घेण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. या सर्व घटनांमुळे आहेरगाव परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.