नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): गोवा राज्यातून मद्याची तस्करी करणारे पुरवठादार ग्रामीण पोलिसांच्या जाळयात अडकले. नाशिक शहरातील मद्य तस्करी करणारा हस्तक फिरोदिया याला अटक करण्यात आली आहे. या कारवाईत रॉयल ब्ल्यु व्हिस्कीचे यापूर्वी हस्तगत केलेले ४४८ बॉक्ससह आणखी ‘२४० बॉक्स’ जप्त एकुण ६६ लाखांचा अवैध मद्यसाठा हस्तगत करण्यात आला आहे.
लोकसभा सार्वत्रिक निवडणुक ५ एप्रिल रोजी नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने मुंबई आग्रा महामार्गावर सोग्रस फाटा परिसरात गोवा राज्य निर्मित मद्याची विनापरवाना बेकायदेशीररित्या तस्करी करणारे ट्रकवर छापा टाकून ४३ लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त केल्याप्रकरणी वडनेर भैरव पोलीस ठाणे येथे गुरनं ९५/२०२४ भादवि कलम ४२०, ४६५, ४६८, ४७१ सह महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (अ) (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्हयात एक आरोपीस अटक करण्यात आली होती. त्याचे कब्जातील ट्रकमधून गोवा राज्य निर्मित रॉयल ब्ल्यु व्हिस्कीचे ४४८ बॉक्स ४३ लाखांचा मद्यसाठा जप्त करण्यात आला होता. आरोपी पदमसिंग बजाज हा गोवा राज्यातून मद्यसाठा ट्रकमध्ये भरून मुंबई आग्रा महामार्गाने गुजरात राज्यात घेऊन जाणार असल्याचे तपासात समोर आले होते.
सदर आरोपीकडे अधिक चौकशी केली असता, त्याने सदरचे मद्य हे गोवा राज्यातील महेश शेठ व बिलाल यांचे सांगण्यावरून नाशिक येथील फिरोदिया शेठ यांचे मार्फतीने त्यांचे आर्या ट्रान्सपोर्टकडील वाहनातून गुजरात राज्यात राजु शेठ यांचेकडे पाठविण्यात येणार असल्याचे तपासात निदर्शनास आले आहे.
सदर प्रकरणातील परराज्यातुन होत असलेल्या अवैध मद्यतस्करीचे पाळे-मुळे नष्ट करण्यासाठी, तसेच यातील मुख्य आरोपींना तातडीने अटक करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पथकांना तपासकामी गोवा व राजस्थान राज्यात रवाना करण्यात आले होते. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजु सुर्वे यांचे पथकाने गोवा राज्यात जुना गोवा परिसरातील गोवा-कर्नाटक महामार्गावर सतत तीन दिवस पाळत ठेवुन यातील मद्याचा पुरवठा करणारे खालील गुन्हेगारांना महामार्गावर सिनेस्टाईल पाठलाग करून शिताफिने ताब्यात घेतले आहे.
संशयित आरोपी:
१) महेशकुमार भुरालाल तन्ना, वय ५८, घडरा. राजश्री टॉवर, सॅटलाईट, अहमदाबाद, गुजरात, हल्ली – मार्टीन एनक्लीव्ह, मिरामार, पणजीम, गोवा. (गोवा राज्य निर्मित मद्य- पुरवठादार)
२) बिलाल उर्फ अदानान सैफुद्दीन मन्सुरी, वय २८, घडरा. जमजम सोसायटी, ओलपाड, सुरत, गुजरात, हल्ली – मार्टीन एनक्लीव्ह, मिरामार, पणजीम, गोवा. (गोवा राज्य निर्मित मद्य तस्करी – मॅनेजर)
यातील आरोपी मद्य पुरवठादार महेशकुमार तन्ना हे गोवा राज्य निर्मित व मर्यादीत असलेला मद्यसाठा हा नाशिक येथील आशिष शेठ फिरोदीया यांचे मार्फतीने महाराष्ट्र व गुजरात राज्यात तस्करी करीत असल्याचे तपासात समोर आले आहे. यातील आरोपी आशिष फिरोदीया यास नाशिक शहरातील गंगापुर रोड परिसरातुन ताब्यात घेण्यात आले आहे.
३) आशिष अमरचंद फिरोदीया, वय ५३, रा. ३०३, प्रियंका ब्लॉसम, सिरीन मिडोज, गंगापुर रोड, नाशिक
यातील आरोपी आशिष फिरोदीया हा त्याचे अवैध मद्य तस्करीमधील परराज्यातील साथीदारांसह नेटवर्क चालवून नाशिक जिल्हयासह गुजरात राज्यात मद्याची तस्करी करत होता. जिल्हयातील परराज्यातुन येणारे अवैध मद्यावे नेटवर्कचे समूळ उच्चाटन करण्यासाठी ग्रामीण पोलीसांची पथके सत्वर कारवाई करत असून महेश तन्ना याचा नाशिक शहरातील हस्तक आशिष फिरोदीया याचे अटकेमुळे मध तस्करीची राज्यातील पाळे-मुळे खोदण्यास पोलीसांना मदत होणार आहे.