नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): इगतपुरी तालुक्यातील घोटी सिन्नर महामार्गावरील उंबरकोन फाट्याजवळ भीषण अपघात ४ जण जागीच ठार झाले आहेत. आज दुपारी दुचाकी क्रमांक MH 15 FZ 7885 आणि स्विफ्ट कार क्रमांक M H 15 EB 7657 या वाहनांचा हा अपघात झाला.
या अपघातात दुचाकीवरील ऋषिकेश तुळशीराम आगिवले (वय २२ वर्ष), टीलू सोमनाथ आगिवले (वय २४ वर्ष), पिंटू राजेंद्र आगिवले (वय २१ राहणार भावली खुर्द, तालुका इगतपुरी) यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर स्वीफ्ट कारमधील एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
या घटनेत गंभीर जखमी मेघा शिंदे, साहील शिंदे, भुमिका वावरे यांना एसएमबीटी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
अपघातस्थळी रुग्णवाहिका चालक मुजफर रंगरेज व रुग्णवाहिका चालक नंदु जाधव यांनी धाव घेऊन जखमींना तातडीने घोटी येथील रुग्णालयात दाखल केल्याने त्यांचे प्राण वाचले. या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उप निरीक्षक अनिल धुमसे, पोलीस हवालदार नितीन कटारे, परीक्षीत इंगळे, केशव बस्ते, सागर सौदागर, बाळु डहाळे आदी करीत आहे.