नाशिक: स्कूल बस व कारचा भीषण अपघात; कारचा चक्काचूर

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): पाथर्डी गावाजवळ कारचे टायर फुटून स्कूल बस व कारचा भीषण अपघात झाला आहे. गुरुवारी (दि. २९ फेब्रुवारी) सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे.

हे ही वाचा:  नाशिक: 'सावाना'तर्फे आज 'स्वर सावाना'त संवादिनी, मोहनवीणा, तबला वादन

याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी, की आज पाथर्डी गावाजवळील सर्कल विहितगावजवळ एक्सयूव्ही 300 कारचे टायर फुटले. त्यावेळी तेथून विद्यार्थ्यांनी भरलेली स्कूल बस जात होती. समोरून भरधाव वेगात कार आली आणि त्याचवेळी तिचे टायर फुटल्याने ती गाडी बसवर आदळली.

हे ही वाचा:  महत्वाची बातमी: नाशिक: शहरातील या महत्वाच्या भागांत आज वाहतुकीस 'नो एंट्री' !

या अपघातात बसमधील काही विद्यार्थी जखमी झाल्याचे समजते. कारचा पूर्ण चक्काचूर झाला असून, जखमी विद्यार्थ्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790