नाशिक (प्रतिनिधी): जस जशी सिमेंटची जंगले वाढत आहेत, तस तसे वन्य प्राण्यांचा मानवी वस्तीकडे कल वाढत चालला आहे. सिन्नर, निफाड, नाशिक तालुके बिबट्याचे वास्तव्य असलेले समजले जातात.
त्यातच सिन्नर शहरात बुधवारी मध्यरात्रीच्या दोन ते अडीच वाजेच्या सुमारास कॅमेरात बिबट्या कैद झाल्याने नागरिकांत मोठ्या प्रमाणावर भीतीचे वातावरण पसरले आहे. बिबट्याच्या डरकाळ्यांच्या आवाजाने नागरिक दहशतीखाली असल्याचे पहायला मिळत आहे.
बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास नेहरू चौकाकडून गवळीनाथ बाबा तसेच वाजे विद्यालयाकडे जाताना हा बिबट्या कॅमेऱ्यात कैद झालेला असून शहरात आता बिबट्याचे वास्तव्य आढळून आले असून यामुळे नागरिकांनी या बिबट्याची दहशत घेतलेली दिसत आहे.
मागेही नाशिक शहरात बिबट्याने एका घराजवळ ठाण मांडल्याने नागरिकांची धावपळ उडाली होती त्यातच आता सिन्नर शहरात बिबट्याने दर्शन दिल्याने गुरुवारी दिवसभर नागरिकांमध्ये बिबट्याच्या चर्चेला उधाण आले होते. लवकरात लवकर या बिबट्याला जेरबंद करावे अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
सिन्नर शहरात बिबट्या दिसल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. त्यातच बाजारपेठेत तसेच आसपास अनेक घरे असल्याने या बिबट्याने दर्शन दिल्याने कॅमेरात कैद झाले आहे.
रात्री अपरात्री अनेक नागरिक बस स्थानकावरून तसेच कामगार वर्ग रात्री घरी येत असताना नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. लवकरात लवकर या बिबट्याला जेरबंद बंद करावे अशी मागणी व्यापारी वर्गाकडून व नागरिकांमधून होत आहे.