नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): मनमाड आणि नाशिक येथील नोकरदार वर्गासाठी व विद्यार्थ्यांसाठी पंचवटी एक्स्प्रेस ही महत्त्वाची रेल्वेगाडी आहे. सुमारे १२० महिला कर्मचारी दररोज मुंबईला ये-जा करतात.
त्यांच्यासह इतर १५० ते २०० महिला व विद्यार्थिनी विविध कामांसाठी पंचवटी एक्स्प्रेसमधून प्रवास करत असतात. या महिलांना मुंबईकडे जाताना मनमाडहूनआरक्षित बोगी होती. त्यामुळे जाताना महिला सुरक्षित जात होत्या.
मात्र, मुंबईहून नाशिककडे येताना आरक्षित बोगी नसायची. प्रवासी वेल्फेअर असोसिएशनने पाठपुरावा केल्याने आता महिलांसाठी मुंबईहून मनमाडपर्यंतही लेडिज स्पेशल बोगी उपलब्ध करून देण्यात आल्याने नियमित प्रवास करणाऱ्या महिलांनी आनंद व्यक्त केला आहे.
पंचवटी एक्स्प्रेसने मनमाड, लासलगाव, निफाड आणि या शहरातून पुरुषांसह नोकरदार महिला रोज मुंबई-नाशिकअप-डाऊन करतात. अशा जवळपास १२० महिला नियमित प्रवास करतात. तर सुमारे १५०ते २०० महिला, विद्यार्थिनी विविध कारणांनी प्रवास करत असतात. कोरोनापूर्वी या एक्स्प्रेसला नियमित आरक्षित बोगी होती.
मात्र त्यावेळी लॉकडाऊनमध्ये रेल्वे बंद होत्या. तेव्हापासून मुंबई ते मनमाड या मार्गावरील हा आरक्षित डबाही आजपर्यंत काढून टाकण्यात आला होता. त्यामुळे महिलांच्या प्रवासादरम्यान सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत होता. महिलांना पुरुषांसह इतर डब्यांमध्ये प्रवास करावा लागत होता. याबाबत महिला प्रवाशांसह प्रवासी वेल्फेअरने पाठपुरावा केल्याने २६ जानेवारीपासून पंचवटी एक्स्प्रेसला कायमस्वरुपी लेडिज स्पेशल बोगी ठेवण्यात येणार आहे.
महिलांचा हा विशेष डबा मनमाडहून मुंबईकडे जाताना चौथ्या नंबरचा असणार आहे. तर सीसीएमटी अर्थात मुंबईहून १९नंबरचा जरी असला तरी तो स्टेशनच्या बाजूने जवळचा असल्याने तसेच दादरला ही तो रेल्वे प्रवेशद्वाराच्या जवळपास येणारअसल्याने महिलांची सोय होणार आहे.
आम्ही विभागीयसल्लागार समितीच्या वतीनेप्रशासनाकडे तक्रार केलीहोती. रेल्वे प्रशासनाने दखल घेत आता महिलांची गैरसोयदूर झाली असल्याचे राजेशफोकणे, अध्यक्ष, प्रवासी वेल्फेअर असोसिएशन यांनी सांगितले.