Crime Breaking: ओळख लपवण्यासाठी चेहरा दगडाने ठेचून युवकाचा खून

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): घोटी शहरातील पचितराय बाबानगर येथील रेल्वे लाईनच्या बाजूला एका युवकाचा खून करण्यात आला आहे. याबाबत घोटी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काल सकाळी स्थानिक नागरिकाने या परिसरात खून झाल्याचे पोलीस ठाण्यात कळविल. पोलीस निरीक्षक विनोद पाटील आपल्या पथकासह तत्काळ घटनास्थळी पोहोचले. मृतदेहाची तपासणी करून तो मृतदेह घोटी

ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.

युवकाच्या डोक्यात व चेहऱ्यावर मोठा दगड टाकून ओळख लपविण्यासाठी आरोपीने प्रयत्न केल्याचे दिसून आले. ही घटना गंभीर असल्याने पोलीस निरीक्षक पाटील यांनी आपल्या खास पथकातील कर्मचारी यांना आरोपीच्या मागावर पाठवले आहे.

घटना व परिसर याची खात्रीशीर माहिती घेत लवकरच आरोपी जेरबंद होतील, असा विश्वास

पोलिसांनी व्यक्त केला आहे. या युवकाच्या चेहऱ्यावर दगडाने आघात करत ओळख पुसण्याचा प्रयत्न आरोपीने केला आहे.

मयत युवकाने अंगावर काळे जॅकेट व काळी जीन्स पॅन्ट घातलेली असून उजव्या हातावर जय भीम नाव गोंदलेले होते. यावरून पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी यांनी परिसर व मोबाईल लोकेशनद्वारे संशयिताला पकडण्यास काही तासांचा अवधी लागेल असे सांगण्यात आले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790