नाशिक: शहरात चोरट्यांचा सुळसुळाट; 3 चोऱ्या, एक घरफोडी

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): गेल्या काही दिवसांमध्ये शहरात चोरट्याच्या सुळसुळाट झाला आहे. बसस्थानकांमध्ये गर्दीचा फायदा घेत महिलांचे दागिने लंपास करणे नवीन राहिलेले नाही. बंद घर दिसताच कुलूप तोडून घरफोड्या सतत सुरूच आहे.

नुकत्यात दाखल झालेल्या गुन्ह्यांमध्ये तीन चोरीच्या व एक घरफोडीच्या घटनेतून चोरट्यांनी ३ लाख ८७ हजारांचा ऐवज चोरून नेला आहे.

ठक्कर बाजार बसस्थानक येथे गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने महिलेच्या पिशवीतील १ लाख १६ हजारांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. प्रविणकुमार काशिनाथ पिळोदेकर (रा. कर्मयोगीनगर) यांच्या फिर्यादीनुसार, गेल्या रविवारी (ता.२१) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ते पत्नीसह ठक्कर बाजार बसस्थानक येथे आले होते.

हे ही वाचा:  शेल्टर -2024 ला  उदंड प्रतिसाद; सुट्टीचे औचित्य साधून आज साईट व्हिजिटचे अनेकांचे नियोजन !

त्यावेळी गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी त्यांच्या पत्नीच्या पिशवीत मंगळसूत्र व दागिने असा १ लाख १६ हजार ९०४ रुपयांचे दागिने असलेली डबी चोरून नेली. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाथर्डी फाटा परिसरात असलेल्या दत्त मंदिर आवारातून एकाची लॅपटॉपसह बॅग असा ३५ हजारांचा मुद्देमाल चोरट्याने चोरून नेला. ओमकार भिमराव कातकाडे (रा. पाथर्डीफाटा) यांच्या फिर्यादीनुसार, गेल्या रविवारी (ता. २१) दुपारी साडेबाराच्या सुमारास त्यांची बॅग चोरीला गेली. बॅगमध्ये लॅपटॉप, हार्डडीक्स, मोबाईल असे साहित्य होते. याप्रकरणी इंदिरानगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे ही वाचा:  नाशिक: 1 ,2 व 3 बीएचके या पारंपरिक फ्लॅट्ससोबतच ग्राहकांचा कल 4-5 बीएचके, स्टुडिओ अपार्टमेंटकडे...

अंबडच्या दत्तनगर परिसरातील घरातून अज्ञात चोरट्याने सोन्याचे दागिने व रोकड असा १ लाख ९५ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. अवधूत रामकृष्ण धांडे (रा. अथर्व अपार्टमेंट, दत्तनगर, अंबड) यांच्या फिर्यादीनुसार, गेल्या बुधवारी (ता. २४) दुपारी १२ ते ४ यावेळेत सदरची चोरीची घटना घडली. याप्रकरणी अंबड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चोरी करताना अटक:
अंबड औद्योगिक वसाहतीमध्ये कंपनीची सुरक्षा तारेतून बेकायदेशीररित्या आत प्रवेश करून कंपनीचा माल चोरी करताना चोरट्याला अटक करण्यात आली. अतुल नंदू कोळसे (२३, रा. अंबड लिंक रोड, अंबड) असे संशयिताचे नाव आहे. राजकिरण प्रदीप शेलार (रा. श्रमिकनगर, सातपूर) यांच्या फिर्यादीनुसार, अबंड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे ही वाचा:  नाशिक: छतावर सौर ऊर्जा निर्मितीसाठी महावितरणतर्फे मोफत नेट मीटर

सावरकरनगरमध्ये घरफोडी:
गंगापूर रोडवरील सावरकर नगरमध्ये बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी मोबाईल व रोकड असा ४१ हजारांचा ऐवज चोरून नेत घरफोडी केली. प्रशांत पाटील (रा. विश्वनाथ पार्क, सावरकरनगर, गंगापूर रोड) यांच्या फिर्यादीनुसार, गेल्या सोमवारी (ता.२२) रात्री घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरफोडी केली. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790