Weather Update: राज्यात हुडहुडी वाढणार, हवामान विभागाचा अंदाज

मुंबई (प्रतिनिधी): पश्चिमेने येणारे थंड वारे आणि आग्नेय दिशेने येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांच्या संयोगामुळे राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाच्या हलक्या सरी सुरु होत्या. दरम्यान आजपासून पावसाचे प्रमाण एकदम कमी होईल आणि थंडीचा कडाका वाढेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. राज्यातील बहुतांश भागांमध्ये हवामान कोरडे राहील, त्यामुळे थंडीत वाढ होण्याची शक्यता हवामान वर्तवली आहे.

राज्यात पावसाच्या हलक्या सारी:
राज्यातील बहुतांश भागात बुधवारी (दि.१०) पावसाने हजेरी लावली. कोकणात आणि खासकरून रत्नागिरीमध्ये ०.५ मिमी पाऊस झाला. मध्य महाराष्ट्र आणि नगरमध्ये ७.८ मिमी पावसाची नोंद झाली. नाशिक आणि पुण्यात १.६ मिमी पाऊस झाला. या शिवाय मराठवाड्यात आणि औरंगाबादमध्ये ०.५ मिमी पावसाने हजेरी लावली. विदर्भ, अकोल्यात ०.२ तर नागपुरात ०.३ मिमी पावसाची नोंद झाली.

विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात गारवा वाढणार:
दरम्यान आजपासून (दि.११) पावसाचा जोर कमी होईल. त्यामुळे राज्यातील ढगाळ वातावरण कमी होणार असून, कोरडे वातावरण निर्माण होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे किमान तापमान ४ ते ५ अंश सेल्सिअसने कमी होण्याचा अंदाज आहे. प्रामुख्याने विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात गारवा वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790