नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): शहरातील नागरिकांना पुढील वर्षीच्या एप्रिलपासून पाण्यासाठी प्रस्तावित करण्यात आलेल्या दरवाढीला स्थगिती देण्यात येत असल्याचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. पालकमंत्री दादा भुसे आणि महापालिका आयुक्त अशोक करंजकर यांच्यात सोमवारी (दि. २७) दुपारी झालेल्या चर्चेनुसार स्थायी समितीच्या निर्णयातील प्रस्तावित दरवाढीला स्थगिती देण्यात येत असल्याचे नमूद करण्यात आले.
केंद्र शासनाच्या १५ व्या वित्त आयोगाच्या निर्देशानुसार जल आणि मलजलाच्या दरात वाढ करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त अशोक करंजकर यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी स्थायी समिती सभा झाली होती. त्यात स्थायी समितीने पाणीपट्टीत अडीचपट वाढ करण्याच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली होती.
पाणीपट्टी दर वाढण्याचे सूतोवाच झाल्याने त्या निर्णयाबाबत समाजमाध्यमांवरही टीका सुरू झाली होती. त्या पार्श्वभूमीवर दरवाढ लागू करण्याचा कालावधी १ डिसेंबर २०२३ ऐवजी १ एप्रिल २०२४ असा करण्यात आला होता, महापालिकेला कोणतीही करवाढ नवीन आर्थिक वर्षात लागू करता येते व त्यासाठी आधीच्या आर्थिक वर्षात परवानगी घेणे आवश्यक असते. त्यामुळे डिसेंबरपासून पाणीपट्टीत वाढ करणे वादात सापडले असते.
त्यामुळे १ एप्रिलपासून शहरातील नागरिकांना एक एप्रिलपासून हजार लिटर पाण्यासाठी ५ रुपयांऐवजी १२ रुपयांचा निर्णय प्रस्तावित झाला होता या सभेत पाणीपट्टीच्या दरात वाढ करण्याच्या, तसेच मलजल उपभोक्ता शुल्क आकरण्याच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. त्या निर्णयानुसार पाणीपुरवठा विभाग पुढील चार वर्षांत पाणीपट्टीत नागरिकांना १ एप्रिल २०२४ पासून मलजल उपभोक्ता शुल्क म्हणून हजार लिटर पाण्यामागे ३ रुपये मोजावे लागणार होते. तसेच पुढील चार वर्षे दरवर्षी हजार लिटरमागे ५० पैशांची वाढ करण्याचाही निर्णय प्रस्तावित करण्यात आला होता. मात्र, ही सर्व प्रस्तावित दरवाढ पालकमंत्री आणि मनपा आयुक्तांच्या चर्चेनंतर स्थगित करण्यात आली असल्याचेही चौधरी यांनी नमूद केले.
![]()
नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा...
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790