नाशिक: कुणाचं कुटुंब गेलं, तर कुणाची सून गेली, तर कुणाचं भविष्यच उध्वस्त झालं…

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातांमुळे नाशिक जिल्ह्यातील अनेक कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून कोणाचं कुटुंब उध्वस्त झालं, तर कुणी पोरकं झालं, तर कुणाचं भविष्यच उध्वस्त झाल्याचं या अपघाताने समोर आणलं.

नाशिक जिल्ह्यातील अकरा प्रवाशांवर काळाने घाला घातला असून संबंधित कुटुंबियांच्या घरी नुसता हंबरडा ऐकू येत असून कोणत्याच घरी चूल पेटली नसल्याचे वास्तव आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील जांबरगाव टोलनाका भागातील समृद्धी महामार्गावर मध्यरात्री ट्रॅव्हल्स बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली. हा अपघात एवढा भीषण होता की, 12 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर वीसहून अधिक प्रवाशी जखमी झाले.

हे ही वाचा:  नाशिक जिल्हा प्रशासन मतमोजणीसाठी सज्ज; अशी आहे तयारी...

दरम्यान मृतांमध्ये एक वैजापूर तर अन्य अकरा मृत हे नाशिक जिल्ह्यातील असल्याचे समोर आले. जेव्हा या घटनेची माहिती संबंधित कुटुंबियांना मिळाली, तेव्हा सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकली. या अपघातात अनेक कुटुंबाच्या आयुष्याची राखरांगोळी झाली असून नाशिकमधील अनेक कुटुंबावर दुःखाचा डोंगरच कोसळल्याचे चित्र आहे.

हे ही वाचा:  नाशिक: आयशर ट्रक व रिक्षाचा अपघात; ४५ वर्षीय इसम ठार…

दरम्यान या अपघातात नाशिक शहरातील समतानगर, राजूनगर, गौळाणेसह निफाड तालुक्यातील वनसगाव, उगाव, पिंपळगाव बसवंत येथील मृतांचा समावेश आहे. समतानगर परिसरात राहणाऱ्या सोळसे कुटुंबातील लखन सोळसे हे आपली पत्नी काजल, 5 वर्षांची मुलगी तनुश्री आणि दोन मुलांसह बुलढाण्याजवळील सैलानी बाबांच्या दर्शनासाठी गेले होते.

दर्शन घेऊन परतत असतांनाच पत्नी काजल आणि 5 वर्षांची मुलगी तनुश्रीवर काळाने घाला घातला. तर शहरातील राजुनगर भागातील गांगुर्डे कुटुंबीयच मृत पावलं आहे. झुंबर काशिनाथ गांगुर्डे, अमोल झुंबर गांगुर्डे, सारिका झुंबर गांगुर्डे यांचा समावेश आहे. यानंतर निफाड तालुक्यातील संगीता विलास अस्वले (वनसगाव), हौसाबाई आनंदा शिरसाट (उगाव), मिलिंद हिरामण पगारे (कोकणगाव), दीपक प्रभाकर केकाने (बसवंत पिंपळगाव) यांचाही मृतांमध्ये समावेश आहे. नाशिक शहरापासून जवळच असलेल्या गौळाणे येथील रजनी गौतम तपासे यांचाही समावेश आहे. एकूणच या अपघातात मायलेकी, एक कुटुंब व अन्य कुटुंबातील एक-एक सदस्य जीवाला मुकला आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790