नाशिक: तालुक्यातील धरण पाणीपातळीत झपाट्याने घट; मॉन्सूनपूर्व नियोजनाची गरज

नाशिक (प्रतिनिधी): वाढत्या उष्मामुळे शहर व तालुक्यात पाण्याची मागणी वाढू लागली आहे. बाष्पीभवनमुळे गेल्यावर्षी तुडुंब भरलेल्या तालुक्यातील धरणातील पाण्याची पातळी झपाट्याने कमी होऊ लागली आहे.

गिरणा, माणिकपुंज, दहेगाव, नाग्यासाक्या आदी धरणातील पाण्याच्या बाष्पाचे प्रमाण दुपटीने वाढले आहे. सध्याचा पाणीसाठा जरी मुबलक असला तरी धरणातील गाळ, व मृतसाठा वजा करता उपयुक्त पाणीसाठा मॉन्सून सुरु होईपर्यंत पुरविण्याची आवश्यकता आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पाऊल लांबण्याची शक्यता असल्याने मान्सूनपूर्व नियोजनाची गरज आहे.

👉 नाशिक: सापडलेला मोबाईल परत करण्यासाठी गेलेल्या तरुणास मारहाण, उपचारादरम्यान मृत्यू

तालुक्यात उन्हाचा पारा ३६ ते ३८ अंश सेल्सिअस राहत असल्याने तालुक्यातील धरणातील पाण्याची पातळी घटू लागली आहे. २००९ मध्ये मुसळधार पर्जन्यवृष्टी झाल्याने दहेगाव शंभर टक्के भरले होते.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: भरधाव मोटारसायकलच्या धडकेत २४ वर्षीय युवतीचा मृत्यू

त्यानंतर अकरा वर्षाच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर दहेगाव धरण लागोपाठ चारवेळेस भरत आलेले आहे. त्यामुळे शहर व तालुक्याला पाणी टंचाईच्या झळा खूप कमी बसल्या आहे. ७३ दक्षलक्ष घनफुट पाणीसाठ्याची क्षमता असलेल्या दहेगाव धरणातून शहराला पाणी पुरवठा होतो.

👉 सटाण्यातील कुटुंबाच्या कारचा अपघात, आईवडिलांच्या डोळ्यांदेखत तीन वर्षीय श्रीयांशचा मृत्यू

तर गिरणा धरणातील मिळणारे पाण्याचे आवर्तन अनियमित मिळत असून त्यामुळे सगळी मदार दहेगाव धरणाच्या पाण्यावर आहे. दहेगाव धरणातील पाण्याची पातळी मोजण्यासाठी किती व्हाल्व्ह पाण्यात बुडाले आहे.

⚡ हे ही वाचा:  मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू; नाशिक जिल्ह्यात गुरुवारपर्यंत ‘यलो अलर्ट’

यावरून किती महिने पाणी पुरेल याचा ठोकताळा जुन्या कर्मचाऱ्यांकडून मांडला जातो. तीच पद्धत परंपरेने अलीकडच्या काळात मान्य झाली आहे. जलपातळी मोजण्याची पट्टी देखील येथे नसल्याने पर्याय म्हणून धरणातल्या उभ्या पाइपवर रंगविलेल्या फूटपट्टीवरील आकडेवारी सध्या धरणातले पाणी मोजण्याचा शास्त्रीय आधार आहे.

👉 वन विभागाला सांगितले बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू, पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये आढळलं भलतंच !

पाइपलाइनवर नदीपात्र ते वरची पातळी येथपर्यंत, चार व्हाल्व्ह आहेत. ते सगळे बुडाले तर धरण क्षमेतेने भरले असल्याचा निष्कर्ष काढण्यात येतो. धरणाची मूळ क्षमता ६९ दक्षलक्ष घनफूट असून जिवंत पाणीसाठा सुमारे ५९ दशलक्ष घनफूट असल्याचे मानले जाते.

⚡ हे ही वाचा:  स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टाने दिली ‘ही’ शेवटची तारीख !

आजमितीस तीन व्हाल्व्ह पाण्यात बुडाले असून पुढील आवर्तनानंतर लवकरच तिसरा व्हाल्व्ह उघडा पडण्याची शक्यता आहे. सद्य:स्थितीमध्ये धरणात सुमारे ३० ते ३२ दक्षलक्ष घनफूट पाणी आहे. असा ‘व्हाल्व्ह’ निष्कर्ष असला तरी उपलब्ध

आकडेवारीतून मृत साठा वगळणे गरजेचे आहे. महिन्याला पिण्याच्या पाण्यासाठी सुमारे ५ ते ६ दक्षलक्ष घनफूट पाणी सोडले जाते. म्हणजे चार महिने पुरेल एवढा जलसाठा आहे असे मानले तरी ही जलपातळी खाली गेल्यावर गढूळ पाण्याचा सामना करावा लागेल. दहेगावच्या पाणलोट क्षेत्रात नेहमी उशिराने पाऊस पडतो. मॉन्सून लांबला तर नांदगावला गिरणा धरणाच्या आवर्तनाची वाट बघणे क्रमप्राप्त ठरणार आहे.

Loading

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
here