नाशिक: घर घेण्यासाठी माहेरहून पैसे आणत नसल्याने विवाहितेचा छळ

नाशिक: घर घेण्यासाठी माहेरहून पैसे आणत नसल्याने विवाहितेचा छळ

नाशिक (प्रतिनिधी): घर घेण्यासाठी माहेरून पैसे आणले नाहीत म्हणून, तसेच मूलबाळ होत नाही म्हणून विवाहितेचा छळ करणार्‍या पतीसह सासरच्या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

👉 हे ही वाचा:  विकसित महाराष्ट्र 2047' सर्वेक्षण: नाशिक जिल्ह्यातील नागरिकांनी 17 जुलैपर्यंत आपले मत नोंदवावे

फिर्यादी महिलेचा विवाह चंद्रकांत ओंकार अहिरे याच्याबरोबर दि. 18 फेब्रुवारी 2013 रोजी झाला होता. तेव्हापासून दि. 8 डिसेंबर 2018 या कालावधीत विवाहिता ही देवपूर, धुळे येथे सासरी नांदत होती. त्यादरम्यान पती चंद्रकांत अहिरे, सासरे ओंकार जिभाऊ अहिरे, सासू ताईबाई अहिरे, शीतल अमोल डावरे व अमोल दादाजी डावरे (सर्व रा. प्लॉट नंबर 90, इंद्रप्रस्थ कॉलनी, देवपूर, धुळे) यांनी संगनमत करून विवाहितेकडे घर घेण्यासाठी माहेरून पैसे आणावेत, तसेच मूलबाळ होत नसल्याच्या कारणातून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केला, तसेच शिवीगाळ व मारहाण करून फारकत देण्याची धमकी दिली.

👉 हे ही वाचा:  नाशिकमध्ये दोन टोळ्यांतील चकमक प्रकरणी ६ आरोपी पकडले; २ गावठी कट्टे, स्विफ्ट कार जप्त

या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या सहा जणांसह गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790