नाशिक: अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदिल; हातातोंडाशी आलेल्या पिकांचे नुकसान
नाशिक (प्रतिनिधी): एकीकडे आधीच शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आलेला असतानाच आता दुसरीकडे निसर्गाने ही शेतकऱ्याला मोठा फटका दिला आहे. मध्यरात्रीच्या सुमारास नाशिक जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली,या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ नुकसान झालं आहे.
जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, इगतपुरी पेठ या भागात काही ठिकाणी जोरदार पाऊस बरसल्याने नुकसान झाल आहे. दोन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण दिसून येत होतं, त्यात हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पाऊस बरसल्याने शेतकऱ्यांची एकच धावपळ उडाली आहे. एकीकडे मालाला भाव मिळत नाही,दुसरीकडे अवकाळी पावसाचा आगमन यामुळे बळीराजा दुहेरी संकटात सापडला आहे.
अवकाळी पाऊस जोरदार बरसल्याने अनेक ठिकाणी बत्ती गुल झाली आहे.ग्रामीण भागात याचा परिणाम दिसून येत आहे,मध्यरात्री पावसाने हजेरी लावल्यामुळे पिकांचं मोठ नुकसान झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अनेक फळभाज्या,पालेभाज्या काढणीला आलेल्या असताना अचानक पाऊस बरसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. अजून पुढील दोन दिवस कोकण वगळता इतर ठिकाणी अवकाळी पाऊस बरण्याचा हवामान विभागाने अंदाज दिला आहे.तसेच येत्या 7 मार्चला गारपीट होण्याचा अंदाज ही वर्तवण्यात आला आहे.
नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणात होण्याचा अंदाज हवामान विभागाणे वर्तवला आहे.त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अवकाळी पावसाने द्राक्ष नगरी हळहळली; बळीराजाच्या हातच्या पिकांवर पाणी:
मध्यरात्रीपासून अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने रब्बी हंगामातील पिकांना मोठ्या प्रमाणावर धोका निर्माण झाला आहे. द्राक्ष, कांदा, गहू आदी पिकांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाल्याने शेतकऱ्यांवर आसमानी संकट कोसळले आहे.
शासनाने त्वरित पंचनामे करून शेतकरी राजाला न्याय द्यावा अशी मागणी अनेक भागातून होत आहे. सिन्नर तालुक्यात अवकाळी पावसाची जोरदार हजेरी सोमवारी पहाटे सहा ते साडेसहा वाजेच्या दरम्यान तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली.
रब्बी हंगामातील पिकांना मोठ्या प्रमाणावर धोका निर्माण झाला आहे. द्राक्ष कांदा गहू आदी पिकांवर नुकसान होण्याचे शेतकरी वर्गातून वर्तवण्यात येत आहे. आसमानी संकटामुळे शेतकरी राजा परत एकदा मोठ्या संकटात सापडलेला आहे. कांदा पिकांना भाव नाही मागील काही महिन्यांपासून अवकाळी पावसाने हाती आलेल्या पिकांचा घास हिरावून नेल्याने शेतकरी मागील वर्षापासूनच अनेक संकटांना तोंड देत आहे. त्यातच सणाच्या वेळी अस्मानी संकटाने पावसाने सिन्नर तालुक्यात अनेक ठिकाणी हजेरी लावल्याने शेतकरी राजा संकटात सापडलेला आहे.
सिन्नरला पूर्व भागात सिन्नर ते खोपडी दरम्यान पाऊस, काही ठिकाणी रस्त्यांवरून पाणी वाहायला सुरुवात झाली होती. चांदोरी सह परिसरात विजांच्या गडगडाटासह दोन तासाहून अधिक काळ पाऊस झाल्याने शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे . निफाडच्या द्राक्ष पंढरीला अवकाळीचा दणका बसला आहे.