नाशिक कॉलिंगचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…
त्र्यंबकेश्वर तहसीलचा ड्रायव्हर दिड लाख रुपयांची लाच घेतांना एसीबीच्या जाळ्यात !
नाशिक (प्रतिनिधी) : मनमाड शहरातील नगरपरिषदेतील तीन कर्मचाऱ्यांना लाच घेताना अटक केल्याची घटना ताजी असतानाच आता तहसील विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने लाच घेतल्याची घटना समोर आली आहे.
त्र्यंबकेश्वर येथील तहसील कार्यालयात नेमणूक असलेला शासकीय वाहन चालक लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात सापडला आहे.
नाशिकसह विभागात लाचखोरीच्या घटनांना ऊत आला आहे. बहुतांश घटनांत सरकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्यामुळे सरकारी कार्यालयांमध्ये भ्रष्टाचाराची कीड मोठ्या प्रमाणात पसरल्याचे चित्र आहे.
हे सातत्याने लाचखोरीच्या घटनांनी अधोरेखित होत आहे. नाशिकमध्ये तर टक्केवारीला उधाण आले आहे. दर एक दिवसाआड लाचखोरीचं एक प्रकरण समोर येत आहे. दरम्यान त्र्यंबकेश्वर येथील तहसील कार्यालयात नेमणूक असलेले शासकीय वाहन चालक अनिल बाबुराव आगीवले हे दीड लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडले आहेत.
- नाशिकच्या तरुणाचा वणीत खून; 6 तासात ग्रामीण पोलिसांकडून तपास
- नाशिक: स्कूल बसच्या चाकाखाली येऊन ८ वर्षीय बालिकेचा मृत्यू
तक्रारदार मौजे इगतपुरी तालुक्यातील शिरसाट येथील असून शिरसाटे गावातील गट नंबर 176 मधील शेत जमीन विकत घेण्याकरता विसर पावती नोटरी केली होती सदर शेत जमिनीच्या संदर्भात तत्कालीन उपवियोग विभागीय अधिकारी इगतपुरी त्रंबकेश्वर जिल्हा नाशिक येथे वाद चालू होता. सदर वादाचा निकाल तक्रार यांच्या बाजूने करून दिल्याच्या मोबदल्यात आगिवले यांनी 24 फेब्रुवारी दोन लाख रुपयांची लाचेची मागणी केली होती. त्यानुसार तक्रारदार यांनी 50 हजार यापूर्वी दिले होते. दरम्यान उर्वरित एक लाख पन्नास हजार रुपये लाचेची रक्कम मागेवाले यांनी पुन्हा तक्रारदाराकडे मागितली यावेळी तक्रारदाराने थेट एसीबीकडे धाव केले घडलेला प्रकार सांगितला एसीबीने नेहमीप्रमाणे सापळा रचत संबंधित शासकीय कर्मचाऱ्यास दीड लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले.