नाशिक कॉलिंगचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…
नाशिक: भरधाव अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत पादचारी ठार
नाशिक (प्रतिनिधी): द्वारका परिसरात भरधाव अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत पादचारी ठार झाल्याची घटना घडली.
अमित कुमार सिंह (४४ रा.निवृत्ती कॉम्प्लेक्स द्वारका) असे मृत इसमाचे नाव आहे.
याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
अमितकुमार सिंह गेल्या सोमवारी (दि.२०) रात्री व्दारकाकडून आडगावच्या दिशेने रस्त्याने पायी जात असतांना हा अपघात झाला होता. महामार्गावरील झाकीर हुसेन हॉस्पिटल परिसरातीन ते सर्व्हीस रोडने पायी जात असतांना पाठीमागून येणा-या अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली होती. मनोज हरवानी यांनी त्यांना तातडीने जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता सोमवारी त्यांचा उपचार सुरू असतांना मृत्यू झाला. अधिक तपास पोलिस नाईक पवार करीत आहेत.
![]()


