सिन्नर जवळ तवेरा उलटली; दोघा साई भक्तांचा मृत्यू अन् 7 जखमी

नाशिक (प्रतिनिधी): सिन्नर-शिर्डी राष्ट्रीय महामार्गावर देवपूर फाट्याजवळ आज सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास शिर्डीहून त्रंबकेश्वरकडे जाणाऱ्या मुंबईस्थित तवेरा जीपला भीषण अपघात झाला.

रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यामध्ये जीप पलटी होऊन झालेल्या अपघातामध्ये भाईंदर व अंबरनाथ येथील दोघांचा मृत्यू झाला आहे.

तर 7 जण जखमी झाले असून त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.

रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात जीप पलटी होऊन हा अपघात झाला.

हे ही वाचा:  नाशिक: चिमुकल्याने गिळली विक्सची डबी; श्वास गुदमरला; डॉक्टर देवदूत ठरले, प्राण वाचवले !

कल्याण व भाईंदर परिसरातील एकमेकांचे नातेवाईक व मित्र असणारे तरुण मंगळवारी साई दर्शनासाठी शिर्डी येथे मुक्कामी थांबले होते. आज सकाळी त्रंबकेश्वर येथे दर्शनासाठी जायचे असल्याने ते सिन्नर कडे जात असताना सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास देवपूर फाट्याजवळ तवेरा जीप एमएच ०४ क्युझेड ९२२८ पलटी होऊन अपघात झाला. वेगात असलेली जीप टायर फुटल्याने जवळपास दोनशे फूट फरफटत गेली.

हे ही वाचा:  नाशिक: चिमुकल्याने गिळली विक्सची डबी; श्वास गुदमरला; डॉक्टर देवदूत ठरले, प्राण वाचवले !

या अपघातात इंद्रदेव दया शंकर मोरया (२५) रा. लोढा पार्क जवळ,भाईंदर पूर्व व सत्येंद्र सुखराज यादव (21) रा. बुवापाडा, अंबरनाथ या दोघांचा गंभीर जखमी झाल्याने अपघात स्थळीच मृत्यू झाला. तर त्रिवेंद्र त्रिपाठी व रोहित मोरया या दोघांना गंभीर दुखापत झाल्याने नाशिकच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. इतर पाच तरुण किरकोळ जखमी झाले. सिन्नर येथील ग्रामीण रुग्णालयात दोन्ही मृतदेहांचे शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या सुपूर्त करण्यात आले.

हे ही वाचा:  नाशिक: चिमुकल्याने गिळली विक्सची डबी; श्वास गुदमरला; डॉक्टर देवदूत ठरले, प्राण वाचवले !

अपघात घडल्यानंतर वावीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कोते, उपनिरीक्षक प्रकाश गवळी विजय सोनवणे हवालदार सतीश बैरागी, नितीन जगताप, क्रेनचालक किरण पाटील आदींनी अपघातस्थळी धाव घेतली. स्थानिक तरुणांच्या मदतीने मृतदेह अपघातग्रस्त वाहनातून बाहेर काढण्यात आले. तर जखमींना उपचारासाठी पाठवण्यात आले.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790