Nashik Crime: टोळक्याचा भरदिवसा वडापाव विक्रेत्यावर कोयत्याने हल्ला

नाशिक (प्रतिनिधी):  शहरात गुन्हेगारीचे सत्र काही थांबायचे नाव घेत नाहीये.

नाशिकरोडला एका वडापाव विक्रेत्यावर भरदिवसा कोयत्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे.

दिवसाढवळ्या नागरिकांना रस्त्यावरून आता सुरक्षितपणे वावरणे मुश्किल झाले आहे.

नाशिक शहराचा महत्वपूर्ण भाग असलेल्या नाशिकरोड परिसरात जुन्या भांडणाची कुरापत काढून वडापाव विक्रेत्यावर टोळक्याने कोयत्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे.

या घटनेने संपूर्ण परिसरात दहशत पसरली असून याप्रकरणी उपनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

दिवसेंदिवस वाढणाऱ्या गुन्हेगारी घटनांनी नाशिक शहर हादरलं आहे. प्राणघातक हल्ल्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. टोळके सर्रासपणे हातात चॉपर, कोयते घेऊन रस्त्यावर दहशत पसरवत आहेत. नाशिकरोड परिसरात जुन्या भांडणाची कुरापत काढून वडापाव विक्रेत्यावर टोळक्याने हल्ला केला आहे. यात हल्ल्यात वडापाव चालक गंभीर जखमी असून यानंतर टोळक्याने परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी वेळीच धाव घेतल्याने परिसरात शांतता निर्माण झाली.

👉 हे ही वाचा:  नाशिक: कंटेनरवर दुचाकी आदळून झालेल्या अपघातात तरूण ठार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बाळू खेलूकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार विशाल गणपत गोसावी या युवकाचा टिळक पथ येथे वडापाव विक्रीचा गाडा आहे. नेहमीप्रमाणे विशाल व त्याचे कामगार ग्राहकांना वडापाव देत असताना अचानकपणे संशयित मयूर जानराव, तुषार जाधव, रोहित नवगिरे आणि त्यांच्या साथीदारांनी सदर ठिकाणी हातात कोयते व रामपुरी चाकू घेऊन दहशत निर्माण करत गोसावी यास गंभीर जखमी केले.

👉 हे ही वाचा:  नाशिकच्या साल्हेरसह १२ किल्ले 'युनेस्को'च्या जागतिक वारसा स्थळ यादीत !

तत्पूर्वी याच टोळक्याने देवळाली गाव येथील बाबू गेनू रोडवर हातात शस्त्र घेऊन दहशत निर्माण करून आजूबाजूच्या घरावर दगडफेक केली होती व एका चार चाकी वाहनाची तोडफोड केल्याचे समोर आले. घटनेची माहिती मिळताच उपनगर पोलीस ठाण्याचे पोलीस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. तत्पूर्वी टोळके फरार झाले होते. दरम्यान विशाल गोसावी यांच्या तक्रारीनुसार नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790