१ मेपासून शिर्डी बेमुदत बंद; साई मंदिरात केंद्रीय राखीव पोलीस ठेवण्याचा निषेध

नाशिक (प्रतिनिधी): शिर्डीतील साई मंदिर देशातील दुसर्‍या क्रमांकाचे श्रीमंत मंदिर आहे. या मंदिरात देशभरातून लाखो भाविक दर्शनासाठी येतात. दरम्यान, 1 मे पासून बेमुदत शिर्डी बंदची हाक देण्यात आली आहे.

कोट्यावधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डीतील साई मंदिराला उडवून देण्याच्या धमक्या आल्या होत्या. यामुळे केंद्र सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. परंतु केंद्र सरकारच्या या निर्णयास शिर्डीकरांनी विरोध दर्शवला आहे. तसेच, येत्या 1 मे पासून बेमुदत शिर्डी बंदची हाक दिली आहे. यामुळे केंद्र सरकार आणि शिर्डी ग्रामस्थ असा संघर्ष चिघळणार असल्याचे दिसत आहे.

काल आयोजित केलेल्या ग्रामस्थांच्या बैठकीत चार विषयांवर अनेक ग्रामस्थांनी आपापली मते मांडली. या सर्वांची मते विचारात घेऊन दि. 1 मे रोजी संपूर्ण शिर्डी गाव बंद ठेऊन संध्याकाळी 6 वाजता ग्रामसभा घेण्यात येणार आहे.

शिर्डी मंदिरला वारंवार धमक्या येत आहेत. त्यामुळे शिर्डीतील साई मंदिराला महाराष्ट्र पोलीस, संस्थेचे सुरक्षा रक्षक, कंमाडो, बॉम्बशोधक पथकासह विविध प्रकारची सुरक्षा दिलेली आहे. मात्र ही सुरक्षा कमकुवत असल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आणि साईबाबा संस्थानला केंद्रीय सुरक्षा पुरवण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

नाशिक: झोपेत असतांना अंगावर कपाट पडल्याने 3 वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू

यावर कोर्टाच्या निर्देशानंतर साईबाबा संस्थानने केंद्रीय सुरक्षा लागू करण्यास तयारी दाखवली आहे. मात्र शिर्डीतील नागरिकांनी या निर्णयास विरोध केला आहे. या निर्णयाविरोधात आंदोलन सुरु केले आहे. नुकतेच शिर्डीतील नागरिकांनी हनुमान मंदिराजवळ भिकमांगो आंदोलन केले.

नागरिकांनी सीआयएसएफ नियुक्तीला विरोध केला आहे. त्यासाठी 1 मे पासून बेमुदत शिर्डी बंदची हाक दिली आहे. शिर्डी ग्रामस्थ आता 1 मे पासून बंद पाळणार आहेत. शिर्डीतील सर्वपक्षीय ग्रामस्थांनी हा निर्णय घेतला आहे. शिर्डी बंद दरम्यान साई मंदिर, दर्शन व्यवस्था, साई संस्थानची निवास व्यवस्था, भोजन व्यवस्था सुरू राहणार आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790