नाशिक (प्रतिनिधी): स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी नाशिकमधून धक्कादायक घटना समोर आली आहे.
शहरातील वडाळा परिसरात महिलेच्या खुनाची घटना उघडकीस आली आहे.
त्यामुळे परिसरात संतापाचे वातावरण आहे.
नाशिकसह जिल्हाभरात स्वातंत्र्यदिनामुळे उत्साहाचे वातावरण होते. अशातच नाशिकमध्ये चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीचा जीव घेतला आहे.
त्यामुळे परिसरात खळबळ पसरली असून नाशिक पोलिसांनी संशयित पतीस अटक केली आहे. संबंधित संशयितांने चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा मोबाईल चार्जरच्या वायरीने गळा आवळून खून केल्याची घटना शहरातील वडाळा गावात घडली आहे.
नाशिक शहरातील वडाळा परिसरात राहणारा रिजवान पठाण हा त्याची पत्नी व मुलांसह राहत होता. तो वारंवार त्याची पत्नी निनाज रिजवान पठाण हिच्या चरित्रावर संशय घेऊन तिच्याशी वारंवार भांडण करत होता. या कारणामुळे अनेकवेळा वाद होऊनही निनाज या कुटुंब सांभाळत होत्या. मात्र काल मध्यरात्री दोन ते पाच वाजेच्या दरम्यान रिजवान याने घरातील मोबाईलच्या चार्जरच्या सहाय्याने त्याची पत्नी निनाजचा गळा आवळून खून केला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून रिजवान याला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी पुढील तपास इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संजय बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत.