नाशिक कॉलिंगचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…
महाशिवरात्रीनिमित्त त्र्यंबकेश्वरसाठी सिटीलिंकच्या जादा बस
नाशिक (प्रतिनिधी): बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची गरज लक्षात घेऊन महाशिवरात्रीनिमित्त शनिवारी (ता. १८) महापालिकेच्या सिटीलिंक बससेवेतर्फे विशेष जादा बसचे नियोजन करण्यात आले आहे.
सद्यःस्थितीत सिटीलिंककडून तपोवन आगारातून १५ बसच्या माध्यमातून १०६ बस फेऱ्या त्र्यंबकेश्वरसाठी केल्या जातात, तर नाशिक रोड आगारातून १० बसच्या माध्यमातून ६० बस फेऱ्या त्र्यंबकेश्वरसाठी केल्या जातात.
- नाशिकमध्ये जॉब शोधताय ? इथे क्लिक करा…
- कुबेश्वर धामच्या रुद्राक्ष महोत्सावातील चेंगराचेंगरीत नाशिकच्या महिलेचा मृत्यू
- नाशिक: कारची दुचाकीला धडक; दुचाकीवरील दोन ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू
या नियमित बस फेऱ्यांव्यतिरिक्त महाशिवरात्रीनिमित्त तपोवन आगारातून ६ बसच्या माध्यमातून ४८, तर नाशिक रोड आगारातून ४ बसच्या माध्यमातून ३२ अशा एकूण १० जादा बसच्या माध्यमातून ८० जादा बस फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. जादा ८० बस फेऱ्या व नियमित १६६ बस फेऱ्या अशा एकूण २४६ बस फेऱ्यांचे नियोजन महाशिवरात्रीनिमित्त करण्यात आले आहे.