मन सुन्न करणारी घटना! स्विमिंग करताना तरुणाला हार्ट अटॅक
नाशिक (प्रतिनिधी): बॅडमिंटन खेळताना एका उद्योगपतीचा हार्टअटॅकने मृत्यू झाला होता. परभणी शहरातील प्रसिद्ध उद्योजक आणि बॅडमिंटनपटू सचिन तापडिया बॅडमिंटन खेळत असताना पाणी पिण्यासाठी थांबले.
पाणी पीत असताना त्यांच्या अचानक छातीत दुखू लागलं.
त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण त्या आधीच त्यांचा मृत्यू झाला होता.
परभणीतली ही घटना ताजी असतानाच आता मालेगावमध्येही अशीच मन सून्न करणारी घटना घडली आहे.
- नाशिक: पंचवटीत व्यावसायिक स्पर्धेतून दोघा भावांना मारहाण
- नाशिक: चक्क टॉयलेटमध्ये लाच स्विकारताना अधिकाऱ्याला पकडले
स्वीमिंग पूलमध्ये पोहायला गेलेल्या एका 19 वर्षीय तरुणाचा ह्दयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना मालेगावमध्ये घडली आहे. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून हा व्हिडीओ मोठ्या प्राणावर व्हायरल होत आहे.
जयेश भरत भावसार असं मृत तरुणाचे नाव असून जयेश आणि त्याचा मित्र दुपारच्या सुमारास पोहायला गेले असता जयेश याने पाण्यात सुर मारल्यानंतर तो स्विमिंग पूलच्या दुसऱ्या बाजूला पोहत पोहचला आणि काही वेळ पाण्यातच होता. मित्राने त्याला बाहेर काढल्यावर जयेश हालचाली सुध्दा करत होता. मात्र त्यानंतर त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. मात्र त्यापुर्वी तो मृत झाला. तीव्र हार्ट स्ट्रोक मुळे त्याचा मृत्यू झाल्याची शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केलीय
![]()
