
बिबट्याच्या हल्ल्यात सहा वर्षीय मुलगा जखमी.. मुलाची आई धावून येताच बिबट्याने ठोकली धूम..
जयेश साबळे, महाराष्ट्र एक्सप्रेस ग्रुप, नाशिक
इगतपुरी तालुक्यात पुन्हा एकदा बिबट्याची दहशत दिसून आलीये. बकऱ्या चारण्यासाठी गेलेल्या एका 15 वर्षीय मुलाचा बिबट्याच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना आता पुन्हा एकदा घराजवळ खेळत असलेल्या 6 वर्षीय मुलावर बिबट्याने हल्ला केल्याचे समोर आले आहे,या घटनेत हा मुलगा हा गंभीर जखमी झालाय.
इगतपुरीच्या काळुस्ते शिवारातील दरेवाडी येथे बिबट्याचे मानवी वस्तीवर हल्ले सुरूच आहे.
एका मुलाचा बिबट्याने याच परिसरात हल्ला करून जीव घेतला असल्याच्या घटनेला काही दिवस उलट नाही तोच, कार्तिक काळू घारे या सहा वर्षीय मुलावर घराजवळ खेळत असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने हल्ला केला.
घाबरलेल्या कार्तिकने जोरात आरडा ओरड केल्याने, त्याची आई बाहेर आली आणि तिने जीवाची पर्वा न करता बिबट्याचा दिशेने धाव घेऊन आरडा ओरडा केला, ह्या प्रकारानंतर बिबट्याने कार्तिकला आपल्या तावडीतून सोडून देत धूम ठोकली. या घटनेत ६ वर्षीय कार्तिक हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे.
स्थानिकांनी देखील याबाबत वन विभागाला याबाबत माहिती दिली असून वन विभागाकडून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. मात्र या परिसरात मादी बिबट्यासोबत तीन बछड्यांचा वावर असल्याने त्यांना जेरबंद करता येत नसल्याची अडचण समोर येत आहे. त्यामुळे या भागातील ग्रामस्थ हे मोठ्या दहशतीखाली आहेत…
![]()


