नाशिक शहरातील या भागांत बुधवारी (दि. १ फेब्रुवारी) पाणीपुरवठा नाही…
नाशिक (प्रतिनिधी): शहराच्या काही भागात उद्या, बुधवारी (१ फेब्रुवारी) पाणी पुरवठा होणार नाही. अशी माहिती महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने दिली आहे. जलवाहिनीची गळती दुरुस्ती करण्याचे काम होणार असल्याचे हा पाणी पुरवठा विस्कळीत होणार आहे.
महानगरपालिका हद्दीतील शिवाजीनगर जलशुद्धीकरण केंद्र येथून प्रभाग क्रमांक 27, 25, 26( भागश:) मधील जलकुंभ भरणे आणि पाणी वितरणाकरीता 900 मिमी व्यासाच्या पीएससी जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो. अंबड जवळ 900 मिमी व्यासाच्या जलवाहिनीला मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे.
सदरचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने नवीन नाशिक विभागातील खालील नमूद ठिकाणी बुधवारी दि. 1 फेब्रुवारी रोजी सकाळ, दुपार आणि संध्याकाळचा पाणीपुरवठा होऊ शकणार नाही. तसेच गुरुवारी दि. 2 फेब्रुवारी रोजी सकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे. नागरिकांनी याची नोंद घ्यावी आणि मनपाला सहकार्य करावे, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यानी केले आहे.