Ad: Latest Job Openings in Nashik City.
नाशिक: विवाहितेच्या आत्महत्याप्रकरणी पती आणि प्रेयसीवर गुन्हा दाखल
नाशिक (प्रतिनिधी): विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी पती व त्याच्या प्रेयसीवर गुन्हा दाखल झाला आहे.
वैशाली आनंदा पगारे यांनी २५ जानेवारीला गळफास घेऊन आत्महत्या केली होती.
याबाबत विवाहितेचे वडील बाबूराव भिका गरुड (रा. मालेगाव जि.नाशिक) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे.
हुंड्यात पैसे व कन्यादान का दिले नाही, जावयास सोन्याचे दागिने का दिले नाही, या कारणावरून वेळोवेळी पत्नीला शिवीगाळ करीत मारहाण करून शारीरिक व मानसिक छळ केल्याने ३० वर्षीय विवाहितेने आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे.
Ad: सावरकर नगर, गंगापूर रोड येथे बंगला विकणे आहे.
आनंद दगा पगारे व माया अशोक खोडवे (रा. दोघे अचानक चौक, सिडको) अशी गुन्हा दाखल केलेल्या संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी संशयित आनंद पगारे व त्याची प्रेयसी माया खोडवे यांच्या छळास कंटाळून मुलीने आत्महत्या केल्याचा आरोप फिर्यादी बाबूराव गरुड यांनी तक्रारीत केला आहे. मयत वैशाली हिला दोन्ही मुलीच झाल्याने या छळात भर पडली. संशयितांच्या जाचास कंटाळून तिने आत्महत्या केल्याचे म्हटले आहे. या प्रकरणाबाबत अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक किरण शेवाळे करीत आहेत.